Pune Crime News : खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन घेवून ग्राहक फरार ; वाघोलीतील डी.बी ज्वेलर्स येथील घटना

सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने दुकानातील दोन चैन गळ्यात घालून धूम ठोकल्याची घटना वाघोलीतील डी बी ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी पाथर्डी ( जि. नगर ) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune
Pune sakal

वाघोली : सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने दुकानातील दोन चैन गळ्यात घालून धूम ठोकल्याची घटना वाघोलीतील डी बी ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी पाथर्डी ( जि. नगर ) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            

याप्रकरणी ज्ञानेश्वर बेद्रे यांनी फिर्याद दिली असून रवी पोपट घुले (वय ३४, रा. पाथर्डी, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील डी बी ज्वेलर्सचे सराफ व रवि घुले यांची ओळख होती.

घुले चैन घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला. सोन्याच्या दोन चैन दाखविल्यानंतर एक चैन त्याने गळ्यात घातली. यानंतर घातलेली चैन तो आरशात बघत होता. दुकानदार दुसऱ्या ग्राहकांशी बोलण्यात व्यस्त असल्याने नजर

Pune
Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगतीला घाटात ‘गती’

चुकवून त्याने धूम ठोकली. सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला. त्याचा मोबाईल बंद झाला. यानंतर सराफाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com