भोर : बंगल्यावर झालेल्या तरुण-तरुणींच्या डान्स पार्टीचे ताजे अपडेट

crime
crimesakal media

नसरापूर : कोरोनाचे नियम धुडकावत केळवडे (ता. भोर) येथील एका बंगल्यावर पार्टी आयोजीत करुन गाण्यांच्या मोठ्या आवाजाच्या तालात नाच करणाऱ्या 13 तरुण तरुणींना राजगड पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मंगळवारी (ता. 1 जुनला) या सर्वांना भोर येथील न्यायालयात हजर राहण्या बाबतही नोटीस बजावण्यात आली असून, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने या सर्वांना लगेचच जामिन होऊ शकतो मात्र न्यायालयात खटला चालल्यानंतर गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली.

crime
पुणे : कोल्हेवाडी गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे थेट शेगावात

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र कडक नियमांची अमंलबजावणी चालू असताना सर्व निर्बंध धुडकावत केळवडे गावच्या हद्दीतील महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपाच्या मागे (ता. 28 रोजी) रात्री फार्म हाऊसवर मोठ्या आवाजातील गाण्यांच्या तालावर तरुण तरुणींचा डान्स चालू असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी यांनी पोलिस पथकासह सदर ठिकाणी धाड घातली असता सुमित प्रकाश साप्ते रा. गाऊडदरा, ता. हवेली यांच्या मालकीच्या केळवडे येथील गट क्रमांक 623 मधील दुमजली बंगल्यामध्ये रंगीबेरंगी लाईटच्या उजेडात व साऊंडच्या मोठ्या आवाजात मुले व मुली डान्स करत असल्याचे दिसले. पोलिस पथकाने ही डान्सपार्टी ताबडतोब बंद करुन डान्स करणारे सागर रमेश जाधव (वय 32) रा. खडकवासला पुणे, सुनिल निवृत्ती पाठक (वय 33 रा. धनकवडी पुणे, विकी वसंत शेलार (वय 25) रा. केळवडे, गणेश विजय कदम (वय 33) रा. पद्मावती पुणे, अविनाश संजय साकरकर (वय 24) रा. विश्रांतवाडी पुणे, विशाल गणेश पासलकर (वय 38) रा. आंबेगाव पुणे, सचिन लक्ष्मण शिंदे (वय 37) रा. धनकवडी पुणे या सात तरुणांसह पुणे शहरातील आंबेगाव, दत्तनगर, नांदेडफाटा, वारजे, माणिकबाग व संतोषनगर दिवा जि. ठाणे येथे राहणाऱ्या सहा तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

crime
पुणे-सोलापूर महामार्गावर रसायनमिश्रीत सांडपाण्याचे तळे

उपनिरीक्षक श्रीकांत जोशी यांनी माहीती देताना सांगितले कि, सदर 13 जणांवर जिल्हाधिकारी यांनी कोरोना प्रतिंबंधासाठी केलेल्या आदेशाचा व नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना नोटीस बजावून राजगड पोलिस ठाण्यातून सोडण्यात आले आहे, व मंगळवार (ता. 1 जून) रोजी भोर न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत. सदर कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील व पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, पोलिस हवालदार एस. एन. कालेकर, एम. व्ही. गायकवाड, शिपाई श्रीमती एस आर कुतवळ, अमोल सुर्यवंशी आदींनी सहभाग घेतला.

crime
पुणे : कोल्हेवाडी गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे थेट शेगावात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com