esakal | पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढतेय; जाणून घ्या आजची आकडेवारी?

बोलून बातमी शोधा

corona update
पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढतेय; जाणून घ्या आजची आकडेवारी?
sakal_logo
By
टीम इसकाळ

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत गेल्या २४ तासात ४०६९ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ४२३५८७ वर पोहचली आहे. तर काल दिवसभरात ४३३९ रुग्ण बरे झाले असून एकूण कोरोना मुक्ती रुग्णांचा आकाडा ३७३८१६ वर पोहचला आहे. काल दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त आहे.

शहरात काल दिवसभरात १९३३६ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली तर एकूण कोरोना चाचणी झालेल्या रुग्णांचा आकडा २१४६४६४ वर पोहचला आहे. शहरात काल दिवसभरात ६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ६८६४ वर पोहचला आहे. शहरात सध्या ४२९०७ रुग्णांवर उपचार सुरू असून १४०२ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

हेही वाचा: पुण्यात १८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी दोनच केंद्र

पुणे जिल्ह्यातील आज पर्यंतची एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८५३२३० एवढी आहे तर ७३८६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९६४२ इतकी आहे तर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०४८४९ इतकी आहे.

हेही वाचा: राजधानीत कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत 412 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 62919 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 69710 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 368976 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 662640 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 8406% झाले आहे.

हेही वाचा: 2 हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र; नाणेघाटातील शिलालेखात 'महारठी' उल्लेख