पुण्यात माणुसकीला काळीमा! आईने आपल्या प्रियकराशीच लावून दिलं पोटच्या मुलीचं लग्न अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

assault

पुण्यात माणुसकीला काळीमा! आईने आपल्या प्रियकराशीच लावून दिलं पोटच्या मुलीचं लग्न अन्...

पुणे- मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका आईने आपल्या प्रियकरासोबतच पोटच्या मुलीचा विवाह लावून दिला. या संतापजनक प्रकरणात पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार वडगाव शेरी भागात घडला आहे. (Pune Crime news in Marathi)

हेही वाचा: भारत जोडोमधील राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवर 'मनसे'ही फिदा; ट्विटने वेधलं लक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब वडगाव शेरी भागात वास्तव्यास आहे. पीडित मुलीच्या आईचे संबंध एका व्यक्तीशी होते. तिने तिच्या मुलीला "हेच तुझे वडील आहेत" असे सांगितले होते. मात्र काही दिवसांनंतर आईनेच मुलीला "तुला या व्यक्तीशी लग्न करावे लागेल नाहीतर मी जीव देईन" अशी धमकी दिली. तसेच पीडित मुलीला आरोपीशी लग्न करण्यास भाग पाडले.

दरम्यान आरोपीने अनेक वेळा या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीचं वय १५ वर्षे असून तिने तिच्यावर झालेले अत्याचाराबाबत शाळेतील मित्राला सांगितले. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

हेही वाचा: शिवाजी महाराज आमची ओळख, आमचा श्वास; आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे संतप्त

या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चंदननगर पोलीस ठाण्यात कलम ५०६, ३७६ यासह बालविवाह प्रतीबंधक अधिनियम ९,१०,११ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून अधिनियम या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Pune NewsPune Crime News