esakal | तळेगाव परिसरात कोरोनाचा कहर
sakal

बोलून बातमी शोधा

covid19 situation in talegaon

तळेगाव परिसरात कोरोनाचा कहर

sakal_logo
By
प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १६ गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, पाच दिवसांत ५३३ रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. १२ ते १६ एप्रिल दरम्यान अवघ्या पाच दिवसांत सोळा गावांमध्ये ५३३ कोरोना बाधित रुग्ण असून, त्यापैकी शिक्रापूर १६०, बुरुंजवाडी १०१ आणि तळेगाव ढमढेरे ८६ या तीन गावांत पाच दिवसांमध्ये एकूण ३४७ कोरोना बाधित रुग्ण झाले असल्याने आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे.

हेही वाचा: पुणेकरांनो, शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन; काय सुरू काय बंद?

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत औद्योगिक कामगार व मजुरांची संख्या जास्त असून, गावाबाहेर ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त आहे. संसर्गातून कोरणाची बाधा नागरिकांना होत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, तोंडाला मास्क लावावे, गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर ठेवावे व शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा: आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात १९५ पाॅझिटिव्ह रुग्ण

दरम्यान, तळेगाव ढमढेरे हे संपूर्ण गाव प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून येथील ग्रामपंचायतीने कोरोनाची साखळी रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात जंतूनाशक फवारणी केली. विविध ठिकाणी सूचना फलक लावले असल्याची माहिती सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी सांगितली.