राजुरीत अज्ञाताने युरिया टाकल्याने कांदा सडला; 1.20 लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीत अज्ञाताने युरिया टाकल्याने कांदा सडला

राजुरीत अज्ञाताने युरिया टाकल्याने कांदा सडला

आळेफाटा : राजुरी (ता. जुन्नर) येथे घंगाळेमळा परिसरात एका शेतकऱ्याच्या कांदा साठवलेल्या आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने जवळपास १५० पिशव्या भरतील एवढा कांदा खराब होऊन, संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, राजुरी येथील सुनिता सुनील हाडवळे यांची त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातच कांद्याची आरण होती. आज (ता.१५) सकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांचे दिर विलास हाडवळे हे कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक कागद घेऊन कांद्याच्या आरणीजवळ गेले असता, आरणीतील कांदा पुर्ण पणे सडुन त्याचा वास येत होता. तर या आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने कांदा सडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कांद्यावरील पात बाजुला केली असता, आतमध्ये संपुर्ण कांदा सडलेला त्यांना दिसला. यामध्ये सुमारे सत्तर - ऐंशी टक्के कांदा सडला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: केंद्राने खताच्या किंमती कमी कराव्यात : अजित पवार

दरम्यान सुनिता सुनील हाडवळे यांचे पती सुनील भगवंता हाडवळे यांचे, परवा (ता.१३) कोरनावर मुंबईत उपचार घेत असताना निधन झाले. उपचारासाठी पैसे लागतील म्हणुन कांदा काढुन साठवून ठेवला होता. या नुकसानीचा कृषी विभागाच्या राजश्री नरवडे तसेच गाव कामगार तलाठी कुमावत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे. याठिकाणी राजुरी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, माजी सरपंच एम. डी. घंगाळे, गौरव घंगाळे, विवेक शेळके, वल्लभ शेळके, दिलीप घंगाळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. दरम्यान कांद्यावर युरिया टाकून नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन, संबंधितांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत

हेही वाचा: WhatsApp मुळे सापडली आई; महिन्याभरापासून होती बेपत्ता

टॅग्स :Pune News