
WhatsApp मुळे सापडली आई; महिन्याभरापासून होती बेपत्ता
पुणे: औंध येथे झोपडपट्टीतील रहिवासी असलेली ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होती. महिलेच्या दोन्ही मुले महिन्याभरापासून आईचा शोध घेत होते. अचानक एक दिवशी त्यांना व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केलेल्या फोटोमध्ये त्यांना आई दिसते. एक महिन्यापासून बेपत्ता असणारी आईला पाहून कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.कोरोनासारख्या महामारीच्या काळात सोशल मिडियाच्या माध्यामांचा योग्य वापर होत असल्याचे दिसते आहे. कोरोना रुग्नांसाठी बेड मिळवणे असो, प्लाझा डोनर मिळवणे असो किंवा एखादे अतिमहत्त्वाचे औषध मिळवणे असो....अशा कारणांसाठी सोशल मिडियाचा नक्कीच चांगल्या प्रकारे वापर होत आहे. गोरगरीब आणि गरजूंना अन्न वाटप करतानाच्या एका फोटोमुळे या कुटुंबाला 1 महिन्यापासून बेपत्ता असलेली आई भेटली आहे.
पुण्यात शूरवीर लहुजी तांडव सेना गरजू आणि गोरगरीबांना मदत करते. रस्त्यावरील निराधार, बेघर लोकांना अन्न वाटप करण्याचे काम हे करतात. अशाच एका उपक्रमादरम्यान काढलेल्या फोटोमध्ये एका महिन्यापासून बेपत्ता असलेली महिला दिसली आणि त्यामुळे त्यांची कुटुंबियांसोबत पुन्हा भेट झाली.
हेही वाचा: पुण्यात पुढील पाच दिवस पावसाचे
संगीता तुपसुंदर असे वृध्द महिलेचे नाव आहे. औंधमध्ये झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहतात. संगीता यांच्या दोन्ही मुलांची घरे वेगळी आहेत. ४ एप्रिलला जेव्हा संगीता पेन्शन आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडल्या. बराच वेळ झाला तरी त्या घरी आल्या नाहीत. ज्या मुलाकडे त्या राहत होत्या त्यांना वाटले की, आई भावाकडे राहालया गेली असेल. त्यामुळे एक दिवस त्यांनी वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी भावाला आईबद्दल विचारले असता भावाने त्याच्या घरी आलीच नाही असे कळविले. त्यानंतर आई बेपत्ता असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर सर्वांनी आईची शोध शोध सुरु केली. संगीता यांचे पती पोलीस कर्मचारी असल्यामुळेळे तातडीने पोलिसांनी हलचाल सुरु केली पण, काहीच पत्ता लागत नव्हता.
हेही वाचा: पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा खून
कोरोना सारख्या चिंताजनक परिस्थितीत शूरवीर लहुजी तांडव सेना गरिबांना अन्नदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकत होते. त्यांचा शिवाजीनगर स्टेशनवर अन्न वाटप करताना संगीता यांच्याबरोबर काढलेला फोटो व्हाट्स अँप व्हायरल झाला होता. योगायोगाने हा फोटो संगीता यांच्या कुटुंबापर्यंत पोहचला. तुपसुंदर भावंडानी तातडीने संपर्क साधून आईला घरी आणले.
डिसेंबरमध्ये संगीता यांच्या मुलीचे निधन झाल्याने त्या नैराश्यात होत्या. त्यामुळेच त्या सोडून गेल्या असाव्या अशी माहिती संगीता तुपसुंदर यांच्या कुटुंबीयांनी दिली.
हेही वाचा: पुणे RTO ला यंदाही फटका;१४ दिवसांत फक्त चार कोटी महसूल