मतदार याद्या अद्ययावत प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून

मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
Voter List
Voter ListSakal

पुणे : निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या सोमवारी (ता. १) प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. एक ते ३० नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. येत्या शनिवारी (ता. १३), रविवारी (ता. १4), शनिवार (ता. २७) आणि रविवार (ता. २८) या दिवशी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. सोमवार (ता. २०) पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. बुधवारी पाच जानेवारी २०२२ रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरुस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. मतदार याद्या अचूक करण्यासाठी संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले आहे.

कोणता अर्ज भरावा

नवीन मतदार नोंदणी किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थानांतर झाल्यास मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६, परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकास मतदार नोंदणीसाठी नमुना ६-अ, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेणे, स्वत:चे किंवा इतर व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी नमुना ७, तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८, मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी (एकाच मतदार संघात निवासाचे ठिकाण बदलले असल्यास) नमुना ८-अ भरून देणे आवश्यक आहे. मोहिमेदरम्यान अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफिसर- बीएलओ) द्यावेत. या सर्व सुविधा https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com