esakal | चेतन तुपे यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण उलगडले!

बोलून बातमी शोधा

chetan tupe
चेतन तुपे यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण उलगडले!
sakal_logo
By
सकाळा वृत्तसेवा

पुणे : शहरातील महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहे. या निवडणुकीत सत्ता काबिज करण्यासाठी पक्षाने बाह्या सरसावल्या असून त्यासाठी पक्षातंर्गत बैठकांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नवा चेहरा आणि नवी कार्यकारिणी शहरात नियुक्त करून पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्याचा सूर पक्षात आहे. तसेच एक व्यक्ती एक पद, धोरणाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह पक्षाच्या नेत्यांकडे शहरातील ज्येष्ठ्य कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नव्या अध्यक्षांची निवड १ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठीच्या तयारीचा एक भाग म्हणून पक्षाने शहराध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या अध्यक्षांची निवड एक मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवे अध्यक्ष शहराची कार्यकारिणी जाहीर करेल. त्यात विविध घटकांना सामावून घेण्यात येईल. तसेच महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याला तोडीस तोड देण्याचे आव्हान नव्या शहराध्यक्षांवर असेल. शहराध्यक्षपदासाठी आता माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी सभागृहनेते सुभाष जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नावे चर्चेत आहेत. तर, आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असे पक्षांतर्गत सूत्रांनी स्पष्ट केले. खासदार वंदना चव्हाण यांनी आठ वर्षे शहराध्यक्षपदावर काम केले होते. त्यामुळे यंदा एखाद्या महिलेला शहराध्यक्षपदावर संधी मिळावी, अशीही मागणी पक्षाकडे करण्यात येत आहे. तर, पक्षातील युवा चेहरा प्रदीप देशमुखही शहराध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत.

हेही वाचा: आमदार चेतन तुपे यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पुणे महापालिकेची सत्ता २००७ मध्ये आली. तत्पूर्वी पुण्याची सत्ता कॉंग्रेसकडे होती. त्यानंतर सलग दोन निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक नगरसेवक निवडणून आणत, महापालिकेतील सत्ता राखली होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे शहरात पहिल्यांदाच भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडूनआले. या लाटेतही पक्षाचे सुमारे ४२ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडून आणले होते. कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांची संख्या सिंगल डिजिटवर आली आहे. आता महापालिकेची निवडणूक सुमारे ८ महिन्यांवर आली आहे. यंदा काहीही झाले तरी, सत्ता पुन्हा काबिज करायची, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमांतही त्या बाबत सातत्याने सुचोवाच केले आहे. तसेच शहराध्यक्ष बदलणार असल्याचेही त्यांनी या पूर्वी तीन वेळा जाहीर केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या बाबत सूतोवाच केले होते. तसेच तुपे यांना या पूर्वी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद, शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, आमदारकी आणि शहराध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे आता नव्या चेहऱ्याला या पदावर संधी मिळावी, अशी मागणी शहरातील काही ज्येष्ठ्य कार्यकर्त्यांनी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर तुपे यांनी पक्षनेत्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर तुपे यांनी शहराध्यक्षपदाची राजीनामा दिला आहे. राजीनामापत्रात तुपे यांनी म्हटले आहे की, हडपसर विधानसभा मतदारसंघात सुमारे पाच लोकसंख्या आहे. या मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. त्यात अनेक विकास कामे सुरू झाली आहेत. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मतदारसंघाला पुरेसा वेळ द्यायचा आहे. त्यासाठी शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा: सोशल मीडियातून तक्रार करणाऱ्यांवर कारवाई नको; सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले