पेठ भागात वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर! पावसामुळे वाडा कोसळला

पेठ भागात वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर! पावसामुळे वाडा कोसळला

स्वारगेट : जुन्या वाड्यांची मुदत संपूनही घरमालक आणि भेडकरू जीवितहानीला आव्हान देत प्रत्येक दिवस ढकलत आहेत .ही समस्या पेठांत सर्रास पाहायला मिळेते .चार दिवसांपूर्वी गुरुवार पेठेतील एका जुन्या वाड्याच्या वरच्या माजल्याची पाठीमागील भिंत कोसळून वाडा भुईसपाट झाला. या वाड्याची एक भिंत शेजारील वाड्यावर पडल्याने बाजूचा वाडाही कोसळला. ही घटना दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडली.

सुदैवाने कोणीही घरात नसल्याकारणाने जीवितहानी झाली नाही. मात्र पेठ भागामध्ये असे अनेक वाडे कधीही कोसळून जिवीतहानी होऊ शकते . या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन एखादी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न पेठेतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पेठ भागात वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर! पावसामुळे वाडा कोसळला
पेशव्यांचे सरदार बाजी गोविंद जोशी यांची समाधी उजेडात

पेठा आणि जुने वाडे यांचे समीकरणच आहे .या भागात तुम्हाला अनेक जुने वाडे जीर्ण अवस्थेत असलेले दिसून येतील .पण तरीही बिल्डर मालक वाद ,मालक भाडेकरू वाद त्याच बरोबर पुरातत्व खात्याच्या काही नियमामुळे या वाड्यांची डेव्हलपमेंट होताना दिसत नाही. कधीही कोसळू शकतात अशा अवस्थेत हे वाडे असताना आपली जागा जाईल की काय या भीतीने भाडेकरू व घर मालक जीव धोक्यात घालून जीर्ण झालेल्या वाड्यांमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.असाच गेल्या काही दिवसाखाली गुरुवार पेठेत पावसामुळे वाडा कोसळला आणि भाडेकरू आणि मालकाचा संसार उघड्यावर आला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

''गेली पन्नास वर्षे आम्ही या वाड्यात राहतोय .मालक आमच्या जागेचा हक्क नाकारतोय त्यामुळे आम्ही वाडा सोडला तर आम्हला आम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळे जीवावर उदार होऊन या पडक्या वाड्यात राहतोय .आमचा हक्क आम्हाला मिळावा''

- मोहन कटारे ( वाड्यातील भाडेकरू)

''आम्ही वेळोवेळी नोटीस देऊनही या वाड्यातील नागरिकांनी घर खाली केले नाही ..त्याचा परिणाम हा वाडा कोसळला आम्ही त्यानी घर खाली केल्यानंतर कारवाई करू शकतो. त्यांना धोकादायक वाड्याच्या बाहेर काढण्याचे काम पोलिस विभागाच आहे''

- रामचंद्र शिंदे ( कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग)

''घटना होताच मी घटनास्थळी पोहचले . आपत्कालीन सेवा देण्याचं व प्राथमिक मदत करण्याच मी काम केलं. हा पेठांतील ज्वलंत विषय आहे तो प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावा.''

- आरती कोंढरे (या भागातील नगरसेविका )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com