
पुणे : इंटरनेटने लोकांच्या घरात सिनेमा आणला आहे. त्यात लॉकडाऊनची साडेसाती... आता चित्रपटगृहे सुरू झाली, तर प्रेक्षक सिनेमा पाहायला बाहेर पडतील का? मग उत्पनाचा शून्य फोडायचा तरी कसा, ही मालकांची चिंता, तर तुटपुंजा पगार आणि त्यातही कपात, मग संसार करायचा कसा? जगणंच थांबल्यासारखं झालय, ही व्यथा कर्मचाऱ्यांची...
मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी
कोरोनामुळे सुरू झालेला लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होऊ लागला आहे. पण चित्रपटगृहे सुरू होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. त्यामुळे थिएटरचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. थिएटरची देखभाल, साफसफाई, कर्मचाऱ्यांचे पगार, मालमत्ता कर, वीज बिल हे खर्च तर सुरूच आहेत. उत्पन्न मात्र शून्य झाले आहे. ही स्थिती बदलायची कशी, असा प्रश्न थिएटर मालक आणि चालक उपस्थित करू लागले आहेत.
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!
विजय थिएटरचे दिलीप निकम म्हणतात, "सिनेमा चित्रपटगृहापर्यंत पोचवणाऱ्या यूएफओ कंपनीने जाहिराती संबंधी केलेले करार रद्द केले आहेत. तीन महिने लॉकडाऊनमुळे शून्य उत्पन्न आहे. त्यात साफसफाईबरोबर अन्य खर्च सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात तरी पैसे द्यावे लागत आहेत. आतापर्यंत कसेतरी नियोजन करून मार्ग काढला आहे. आतातरी किमान थिएटर सुरू व्हायला हवीत."
- ... म्हणून ९७ टक्के शहराने घेतला मोकळा श्वास; काय आहे 'स्मार्ट सिटीचा स्मार्ट फंडा?'
कोरोनामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतील का, ही खरी चिंता आहे. पुन्हा शो सुरू करायचे, तरी आसनव्यवस्था बदलावी लागेल, कमी प्रेक्षकांना प्रवेश द्यावा लागेल. यामुळे तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम प्रेक्षकांच्या संख्येवर होईल, याची काळजी आम्हाला आहे. थिएटर सुरू झाले की सर्वच खर्च पुन्हा सुरू होतील. त्यासाठी काही सवलती या व्यवसायाला द्यायला हव्यात, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.
खडकी बाजार येथील व्हिलक्स थिएटरचे मालक दीपक कुदळे या व्यवसायाची व्यथा मांडताना म्हणाले, "वीज बिलाची आकारणी सरासरी पद्धतीने केली आहे. पण या काळात उत्पन्नच मिळालेले नाही. कर आकारणी सुरूच आहे. मला वाटते सरकारने मालमत्ता कर सध्या आकारू नये, तीन महिन्यांच्सा वीज बिलात माफी द्यावी. व्यवसाय बंद असला, तरी कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात करामध्ये काही सवलती दिल्या तरच या व्यवसायाला उभारी मिळेल."
- 'शाळा बंद पण फी भरा'; शिक्षण संस्थांनी लावला पालकांकडे तगादा!
एक पडदा असो की मल्टिप्लेक्स थिएटरमधील कर्मचाऱ्यांन वेतनही कमी झाले आहे. यामुळे कौटुंबिक पातळीवर निर्माण झालेल्या समस्या अनेकांनी मांडल्या. मात्र नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर. अनेकांना मुलांच्या शिक्षण आणि भवितव्याची चिंता सतावते आहे. कुणी कर्ज कसे फेडायचे, तर पुन्हा थिएटर सुरू होतील का, पुन्हा पगार सुरू होईल का, या चिंतेत आहे. थिएटर मालकांना या परिस्थितीत काही पैसे देऊन आधार दिल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
- मोठी बातमी : अखेर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर!
''रुपेरी पडद्यावरची चकचकीत दुनिया आणि स्वप्ने आम्ही प्रेक्षकांना दाखवतो खरी; पण लॉकडाऊनमुळे आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. मुलाबाळांच्या भवितव्याबाबत पाहिलेली स्वप्ने पूर्ण होणार का हीच खरी चिंता आहे.''
- मशीन ऑपरेटर (खडकी)
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
''गोवा आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही प्रती तिकिट 20 रुपये सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय 13 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन सरकारने घेतला होता. पण त्याची अंमबजावणी झाली नाही. यापुढील काळात तरी हे शुल्क आकारण्याची मुभा आम्हाला दिली पाहिजे.''
- दीपक कुदळे (माजी अध्यक्ष सिनमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोशिएशन ऑफ इंडिया)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.