esakal | शिरूरमधील कापडाच्या दुकानात चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शिरूरमधील कापडाच्या दुकानात चोरी

sakal_logo
By
युनूस तांबोळी ः सकाळ वृत्तसेवा

टाकळी हाजी ः शिरूर तालुक्यातील मलठण येथे एक कापड दुकान व एका घराचा दरवाजा तोडून चोरी झाली. तिसऱ्या ठिकाणी चोरट्यांचा दुकान फोडण्याचा डाव फसला. यामध्ये एक लाख पन्नास हजारांचे कपडे व वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. कोरोनामुळे दुकाने बंद असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या बाबत गेनभाऊ शिंदे यांनी शिरूर पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार मलठण (ता. शिरूर) येथील शिंदे कॉम्प्लेक्समधील कांतीलाल बारगळ यांच्या रुद्र ब्रँड हाऊस मधून कपडे, बूट ह्या वस्तूंची रविवारी (ता. 25) रात्री दुकानाचे शटर तोडून चोरी केली. यामध्ये एक लाख पन्नास हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. शिंदे वस्तीवरील विनायक रामचंद्र शिंदे यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 132 इंची एलएडी टिव्ही, शेगडी व काही वस्तूंची चोरी केली आहे. कांतीलाल बारगळ ह्या सुशिक्षित बेरोजगाराने चार महिन्यांपूर्वी दुकान सुरू केले होते. त्यासाठी त्याने कर्जप्रकरण केले होते. नव्या उमेदीने सुरू केलेल्या हे दुकान लॉकडाउनमुळे बंद होते. त्यातच चोरी झाल्यामुळे ते अजूनच व्यथीत झाले आहेत. विनायक शिंदे हे पोलिस दलात पुणे येथे कर्तव्यावर असून त्यांच्या घरी कोणीही नव्हते. कोविड लॉकडाउनची ड्युटी असल्याने त्यांना नेमका किती ऐवज चोरीस गेला आहे हेही अजून समजले नाही. गावात नरेंद्र राजगुरू यांचे टायर पंक्चरचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांना वेळीच जाग आल्याने चोर मोटार सायकलवरून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास शिरूर पोलिस करत आहे.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

loading image