पुण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरात चोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

- गणेशोत्सवात साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात चोरीची घटना झाली आहे.
- बाजीराव रस्त्यावरील नातूबाग गणपती मंडळाच्या मंदिरात देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते
- चोरट्यांनी मंदीरातील दानपेटीच लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पुणे : गणेशोत्सवात साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात चोरीची घटना झाली आहे. बाजीराव रस्त्यावरील नातूबाग गणपती मंडळाच्या मंदिरात देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. चोरट्यांनी मंदीरातील दानपेटीच लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बाजीराव रस्त्यावरील नातूबाग गणपती मंडळाच्या मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लंपास केली. सकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. तेथे असलेले सीसीटीव्ही तपासले असता, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंदीराचे कुलूप तोडले. मंदिरात जाऊन दानपेटी उचलून बाहेर आणली. त्यानंतर दुचाकीवर बसून पळून गेले. या दानपेटीमध्ये १० हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. 

गेल्या एका वर्षापासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. श्रावण महिना सुरू झाला की, ही दानपेटी उघडली जाते, त्यात जमा झालेली रक्कम गणेशोत्सवात वापरली जाते, पण यावेळी चोरट्यांनी आम्हाला दानपेटी उघडण्याची संधी दिली नाही, असे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at the famous Natubag temple in Pune