पुणे : सख्ख्या भावांसह चौघांनी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

  • दागिने घडविण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे सोने घेऊन सख्ख्या भावांसह चौघांनी काढला पळ 

पुणे : सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा करुन चौघांनी शहरातील सराफी व्यावसायिकांकडून एक ते दिड किलो वजनाचे व लाखो रुपयांचे किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पश्‍चिम बंगाल येथील दोन सख्ख्या भावांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही घटना तीन जानेवारीला रविवार पेठेमध्ये घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसन्न जीत मंहतो व चिरंजीव जीत मंहतो ( दोघेही रा. रविवार पेठ, मुळ रा.पश्‍चिम बंगाल ) यांच्यासह चौघांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिनेश पावटेकर (रा. रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पावटेकर यांचे रविवार पेठेत सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानाजवळच प्रसन्न व चिरंजीव हे दोघे भाऊ अडीच वर्षांपासून दागिने घडविण्याचे काम करीत होते. त्यांना अन्य दोघेजण मदत करीत होते.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

दोघेही सराफी व्यावसायिकांनी दिलेल्या लगडीचे दागिन्यांत रुपांतर करुन वेळेत घडविलेले दागिने देत होते. त्यामुळे सराफी व्यावसायिकांचा त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. त्यानुसार, फिर्यादी यांनीही त्यांच्याकडे 270 ग्रॅम सोन्याची लगड त्यांना दिली. त्यानंतर अन्य सराफी व्यावसायिकांकडून घेतलेले सोने, असे एक ते दिड किलो सोने घेऊन त्यांनी पुण्यातुन पळ काढला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of gold worth millions rs in ravivar Peth Pune