पुणे : तरुणींनो, चोरांचा आहे तुमच्या पर्सवर डोळा; तुळशीबागेत चोरीच्या घटना!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

विशेषतः शनिवारी आणि रविवारी महिलांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे. शनिवारी भरदिवसा चोरीच्या तीन घटना घडल्या.

पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता शहराच्या मध्यवस्तीमध्येही चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्यवर्ती भागातील तुळशीबाग, बेलबाग परिसरामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पर्समधील रोकड, मौल्यवान वस्तू भरदिवसा पळविण्याच्या तीन ते चार घटना शनिवारी (ता.11) घडल्या. बाजारपेठेत जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रीय झालेली असतानाही पोलिस मात्र अजूनही शांत असल्याची सद्यस्थिती आहे. 

- धक्कादायक : बारावीच्या मुलाचं डेटिंग साईटवर अकाऊंट; दोन लाखांची फसवणूक

याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. महिला, प्रवासी महिलांना लक्ष्य करुन चोरट्यांकडून जबरदस्तीने सोनसाखळी, मोबाईल व रोकड चोरण्याचे प्रकार घडतात. घटनेनंतर तत्काळ पळून जाता येईल, यादृष्टीने चोरट्यांकडून उपनगरांमध्ये चोरीचे प्रकार केले जातात. हेच लोण आता तुळशीबाग, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, महत्मा फुले मंडई, रविवार पेठ अशा वर्दळीच्या बाजारपेठेमध्ये पोचले आहे.

विशेषतः शनिवारी आणि रविवारी महिलांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे. शनिवारी भरदिवसा चोरीच्या तीन घटना घडल्या. विशेषतः दामिनी पथक, गस्तीवरील पोलिस असूनही त्यांच्याकडून चोरट्यांवर नियंत्रण ठेवता येत नसल्याची सद्यस्थिती आहे. 

- मराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ

शनिवारी मध्यवर्ती भागात घडलेल्या चोरीच्या घटना 

- दुपारी पावणे दोन : लातूर जिल्ह्यातील चिंचोली काजळे येथील 24 वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता बेलबाग चौकातील एका दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. महिला मुळचंद दुकानासमोर आली, त्यावेळी चोरट्यांनी महिलेच्या सॅकमधील पर्स चोरुन नेली. त्यामध्ये सात हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. 

- दुपारी अडीच : आकुर्डीतील बिजलीनगर येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीकडीलाही चोरट्यांनी हिसका दाखविला. तरुणी बेलबाग चौकामधील एका साडीच्या दुकानामध्ये साडी खरेदीसाठी आली होती. खरेदी झाल्यानंतर ती रस्ता ओलांडून जात असताना तेथील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तरुणीकडील पिशवीतून दीड हजार रुपयाची रोकड आणि मोबाईल असा पाच हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 

- 'त्याचा' जीव घेणाऱ्यांवर कारवाई करा; मागणीसाठी प्राणीप्रेमींचा मोर्चा!

- सायंकाळी सहा : वारजे माळवाडी येथे राहणारी 24 वर्षीय तरुणी खरेदीसाठी तुळशीबागेमध्ये आली होती. तुळशीबागेतील खरेदी उरकल्यानंतर त्या कुंटे चौकाकडे जाताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सहाशे रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरुन नेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft incidence were reported in Tulashibaug market area of Pune