'त्याचा' जीव घेणाऱ्यांवर कारवाई करा; मागणीसाठी प्राणीप्रेमींचा मोर्चा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

सिगल सोसायटीमध्ये सुरक्षा पर्यवेक्षक आणि त्याच्या साथीदाराने भटक्या कुत्र्याला लोखंडी गजाने मारहाण केली. त्याला गंभीर जखमी केल्यानंतर सोसायटीमागील मोकळ्या जागेत फेकून दिले.

हडपसर : हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकातील एका सोसायटीत सुरक्षा पर्यवेक्षक आणि त्याच्या साथीदाराने भटक्या कुत्र्याला लोंखडी गजाने मारहण केली. या घटनेत कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेतील दोषीवंर तातडीने कारवाई करण्याबाबत वीवा संस्थेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुमच्या आणि सैतानात फरक काय? प्राण्यांवरील अत्याचार थांबवा, जस्टीस फॉर लकी, त्यांचा गुन्हा तरी काय? ही क्रुरता का? प्राणी वाचवा, माणुसकी वाचवा, रोटी देणे की औकात न हो तो बेजुबान को मारने का हक किसने दिया, प्राण्यांच्या जगण्याच्या हक्कावर गदा का? अशा प्रकाराचे फलक हातात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.

- धक्कादायक : बारावीच्या मुलाचं डेटिंग साईटवर अकाऊंट; दोन लाखांची फसवणूक

याप्रसंगी प्राणी प्रेमी विनिता टंडन, अनिकेत भोसले, प्रियंकासिंग राठो़ड, मोना डे, प्रेम कांता, जयश्री पांडे, मानसी रेगे यांसह अनेक प्राणी मित्रांनी या मोर्चात सहभाग घेतला. संतप्त प्राणी मित्रांना वानवडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शांत केले. घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोपींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यांनतर मोर्चातील प्राणीप्रेमींनी आपला मोर्चा थांबवला.

- मराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ

दरम्यान, सिगल सोसायटीमध्ये सुरक्षा पर्यवेक्षक आणि त्याच्या साथीदाराने भटक्या कुत्र्याला लोखंडी गजाने मारहाण केली. त्याला गंभीर जखमी केल्यानंतर सोसायटीमागील मोकळ्या जागेत फेकून दिले. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत वीवा संस्थेने शनिवारी (ता.12) वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

- ठाकरे सरकार फडणवीसांना आणखी एक धक्का देणार ?

वीवा संस्था भटके कुत्रे आणि फिरस्ती जनावरे यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवते. तसेच प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाईदेखील करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viva Institute has demanded strict action against the security guard who killed the dog