esakal | विज पंपाच्या केबल चोरीची माहिती कळवा, 51 हजार मिळवा

बोलून बातमी शोधा

Theft of the power pump cable
विज पंपाच्या केबल चोरीची माहिती कळवा, 51 हजार मिळवा
sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : येडगाव ( ता. जुन्नर) येथील दोन देवळे येडगाव धरण जलाशयात असलेल्या बारा कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या विज पंपाच्या केबल आज (ता.२२) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. मागील पंधरा दिवसातील केबल चोरीची ही दुसरी तर तीन वर्षातील सहावी घटना आहे. मात्र या सराईत टोळीचा पोलीस अद्याप छडा लावू शकले नाहीत. या चोरट्यांचा पोलीस कधी छडा लावणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. येडगाव धरण जलाशय परिसरातील इंदिरानगर, कैलासनगर, हांडे मळा, गणेशनगर, दोन देवळे येथे सुमारे चारशे कृषी उपसा जलसिंचन व नळ पाणीपुरवठा योजनेच्या वीज मोटारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये इंदिरानगर येथील ५५ कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या केबल जाळून त्या मधील तांबे धातूची तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. या मुळे शेतकऱ्यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. ६ एप्रिल २०२१ रोजी येथील तेरा शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली होती. त्या नंतर या शेतकऱ्यांनी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून नवीन केबलची जोडणी करून कृषी पंप सुरू केले होते. आज ( ता.२३) मध्यरात्रीच्या सुमारास त्याच शेतकऱ्यांच्या बारा कृषी पंपाच्या केबालची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.पंधरा दिवसांत येथील शेतकऱ्यांच्या केबलची दुसऱ्यांदा चोरी झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मागील दोन वर्षा पासून शेतकरी अडचणीत आहेत. नवीन केबल टाकली की लगेच चोरी होत असेल तर पोलीस काय करतात . एका कृषी पंपाला सुमारे शंभर मीटर केबल लागते.या साठी सुमारे तेरा हजार रुपये खर्च होतो. पंधरा दिवसांत केबलसाठी एका कृषी पंपाला सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च होत असेल तर शेती कशी करायची. पोलीस येतात पंचनामा करतात त्या नंतर तपास होत नाही. या मुळे चोरांचे फावले आहे.-गुलाबराव नेहरकर, माजी सरपंच

एकावन्न हजार रुपयांचे बक्षिस : केबल चोरी वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. पोलीस चोरट्यांचा छडा लावू शकत नाहीत. चोरट्यांची माहीती देणाऱ्यास एकावन्न हजार रुपयांचे बक्षिस आज शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. या बाबत सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे ( मो. बा. 99224 48100) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन माजी सरपंच नेहरकर यांनी केले आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर