पुणे : कारच्या काचा फोडून दिड लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

पुणे : भाच्याच्या वाढदिवसासाठी गेलेल्या एका महिलेच्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा दिड लाख रुपयांचा ऐवज असलेली हॅन्डबॅग चोरुन नेली. ही घटना गुरूवारी सायंकाळी बाणेर पाषाण लिंक रोड येथे घडली. 

पुणे : भाच्याच्या वाढदिवसासाठी गेलेल्या एका महिलेच्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा दिड लाख रुपयांचा ऐवज असलेली हॅन्डबॅग चोरुन नेली. ही घटना गुरूवारी सायंकाळी बाणेर पाषाण लिंक रोड येथे घडली. 

याप्रकरणी स्नेहल कौलवकर (वय 28, रा. कर्वेनगर) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहीणी आहेत. त्यांचे भाऊ औंध येथे राहतात. गुरुवारी त्यांच्या भावाच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त वडील भावाच्या घरी आल्याने त्या भावच्या घरी गेल्या. जाताना त्यांनी त्यांच्यासमवेत सोन्या-चांदीचे दागिने असलेली एक हॅन्डबॅग स्वतःबरोबर घेतली होती. भावाच्या घरुन इतर पाहूण्यांसमवेत त्या सायंकाळी सात वाजता बाणेर पाषाण लिंक रोडवरील आयकेज लॉनमध्ये गेल्या. त्यांनी लॉनसमोरील रस्त्यावरच त्यांची कार लावली. त्यानंतर त्या वाढदिवसासाठी लॉनमध्ये गेल्या. 

दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्यासमवेत आणलेली हॅन्डबॅग कारच्या पाठीमागील सीटवर ठेवून देऊन त्या वडीलांसमवेत कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्या. बॅगेमध्ये मंगळसुत्र, कर्णफुले, सोनसाखळी, अंगठी व अन्य महत्वाची कागदपत्रे असा दिड लाख रुपयांचा ऐवज होता. वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या रात्री अकरा वाजता कार घेण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कारमध्ये ठेवलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने चतुःश्रृंगी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केला. 
 

Web Title: theft of one and half lakh jewelry by broken glass of car