एेकावे ते नवलच, चक्क बटाट्यांची चोरी !

डी. के. वळसे पाटील
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मोबईल, दुचाकी, पाकीट, अशा वस्तूंची चोरी करणारे अनेक चोरटे आहेत. मात्र, चोरट्यांची नजर कशावर जाईल, हे सांगता येत नाही. कारण, आता थेट शेतातील बटाटे चोरणारेही चोरटे तयार झाले आहेत. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

मंचर (पुणे)  : मोबईल, दुचाकी, पाकीट, अशा वस्तूंची चोरी करणारे अनेक चोरटे आहेत. मात्र, चोरट्यांची नजर कशावर जाईल, हे सांगता येत नाही. कारण, आता थेट शेतातील बटाटे चोरणारेही चोरटे तयार झाले आहेत. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.  

आंबेगाव तालुक्‍यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात साठविलेल्या बटाट्याची राखण करण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. काढणी केलेल्या बटाट्याचे बाजारभाव प्रती किलोला तीस ते 35 रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे चोरटे बटाट्याची चोरी करत आहेत.

पेठ (ता. आंबेगाव) येथील शेतकरी राम सीताराम बुट्टे यांच्या आरनीतील एक हजार 800 किलो बटाट्याची चोरी झाली. या बटाट्याची एकूण किंमत 55 ते साठ हजार रुपये आहे. सातगाव पठार हा परिसर बटाटा उत्पादनात अग्रेसर आहे. ऑक्‍टोबर महिन्यात काढणी केलेला बटाटा शेतकऱ्यांनी शेतातच साठवलेला आहे. ऊन, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी बटाट्याच्या ढिगावर वाळलेले गवत व सागाची पाने टाकली आहेत. शुक्रवारी (ता. 8) रात्री चोरट्यांनी आरनीतून बटाटे चोरून नेले.

या प्रकारामुळे शेतात बटाटा साठवलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे काही शेतकऱ्यांनी शेतातील बटाटाचे ढीग उचलून घरासमोर लावण्यास सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी अधूनमधून फेऱ्या मारून बटाटा ढिगावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of potatoes in the fields by thieves