वधुच्या आईला लग्नाचे फोटोसेशन पडले महागात; वाचा काय घडले?

theft of purse Of brides mother at photosession of marriage in Pune
theft of purse Of brides mother at photosession of marriage in Pune

पुणे : लग्नसोहळ्यामध्ये आग्रहाखातर वधु-वरासमवेत छायाचित्र काढत असताना वधुच्या आईकडील सव्वा लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी पळविली. छायाचित्र काढल्यानंतर बॅग चोरीला गेल्याचे कळल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. ही घटना शनिवारी रात्री बाणेर रस्त्यावरील कुंदन गार्डन येथे घडली. याप्रकरणी कोथरुड येथे राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्‌ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे उलगडले रहस्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास बाणेरमधील कुंदन गार्डन येथे लग्न होते. संपुर्ण लग्नसोहळा व्यवस्थित पार पडला. बराच वेळ वधु-वरांचे छायाचित्रे काढण्याचे काम छायाचित्रकारांकडून सुरू होते. दरम्यान, वधुची आई असल्याने फिर्यादी यांनाही फोटो काढण्यासाठी आग्रह करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याकडील बॅगेमध्ये त्यांनी जेवणाच्या कंत्राटदाराला देण्यासाठीची रक्कम, आहेरामध्ये आलेली रोख रकमेची पाकीटे, चांदीचे दागिने, महत्वाची कागदपत्रे व मोबाईल असा ऐवज ठेवला होता. छायाचित्र काढताना संबंधीत छायाचित्रकाराने "तुमच्या खांद्याला असलेली पर्स बाजूला काढून ठेवा' असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्याकडील बॅग पाठीमागे असलेल्या वधु-वराच्या खुर्चीवर ठेवली.

तानाजी चित्रपटासाठी विद्यार्थ्याने चक्क मुख्यध्यापकांना लिहिले.... 

छायाचित्रे काढून झाल्यानंतर काही वेळाने त्यांनी पाठीमागील खुर्चीवर त्यांची बॅग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना बॅग तेथे आढळली नाही. बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार एम.सी.तारु करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com