अन्‌ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे उलगडले रहस्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

दीपकचे सुनीताशी प्रेमसंबंध होते. दीपक हा कापूरहोळ येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. दरम्यान, त्याचे सुनीताशी आर्थिक कारणावरून वाद झाले होते. 14 जानेवारी रोजी सुनीता त्याच्या कंपनीमध्ये गेली. तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरून कंपनीच्या आवारातच त्या दोघांची भांडणे झाली.

पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावर पोत्यात सापडलेल्या महिलेचा खून हा प्रेमसंबंध व आर्थिक वादातून झाल्याचे उघड झाले. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोघांना अटक केली आहे.
 

une/robbery-booking-movie-tickets-online-under-name-internet-handling-charges-254026" target="_blank">‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून लूट

दीपक रावसाहेब सुकळे (वय 25 , रा. पीडीएम कंपनीशेजारी, कापूरहोळ, भोर), धमेंद्र जांबुवंत तडसरे (वय 38, रा. नीलविहार सोसायटी, पाटील वस्ती, धायरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सुनीता बापू शेळके (वय 40, रा. कर्वेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

सामान्यांकडून दंड वसूल; पोलिसांच्या वाहनांकडे मात्र दुर्लक्ष

दीपकचे सुनीताशी प्रेमसंबंध होते. दीपक हा कापूरहोळ येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. दरम्यान, त्याचे सुनीताशी आर्थिक कारणावरून वाद झाले होते. 14 जानेवारी रोजी सुनीता त्याच्या कंपनीमध्ये गेली. तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरून कंपनीच्या आवारातच त्या दोघांची भांडणे झाली. त्यानंतर दीपकने तिला मारहाण केली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्याने अल्पवयीन पुतण्याच्या मदतीने तिचा मृतदेह पोत्यामध्ये भरून ठेवला. दरम्यान, त्याने त्याचा मित्र धर्मेंद्र यास बोलावून घेत दोघांनी तिचा मृतदेह गाडीवरून नवीन कात्रज बोगद्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ टाकून दिला. त्यानंतर दोघेजण पसार झाले होते.

पुण्यातील 'या' परिसरातील पाण्याचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेलेच
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांच्या पथकाने संशयावरून दीपकला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: revealed murder mystery of the woman dead body found at katraj Pune