शेवंताई गॅस एजन्सी व बुलेट शोरूमचे शटर उचकटून 12 लाखांची चोरी

शेवंताई गॅस एजन्सी व बुलेट शोरूमचे शटर उचकटून 12 लाखांची चोरी

नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या शेवंताई गॅस एजन्सीच्या गोडाऊनचे व बुलेट शोरूमचे शटर उचकटून अज्ञात चोरटा चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने व साहित्य असा ११ लाख ,९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

या बाबत सुदर्शन नंदकुमार बोरकर यांनी फिर्याद दिली आहे.बोरकर यांच्या शेवंताई गॅस एजन्सी गोडाऊनचे व  बुलेट शोरूमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली ३ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम व सूर्या कंपनीच्या शेगड्या,सुरक्षा पाईप,सॅमसंग कंपनीचा एक एल सी डी,रेगुलटर,पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, हेल्मेट,जॅकेट आदी साहित्य असा ११ लाख ,९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली. त्या नंतर याबाबतची माहिती बोरकर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी  सहायक पोलिस निरीक्षक गुंड यांनी भेट दिली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com