...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

बारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून शिवसेनेला दिला. समविचारी पक्षांनी एकत्र यावे असा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र तरीही जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लोकसभा विधानसभा निवडणूकांना सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज स्पष्ट केले.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी दानवे आज बारामतीत आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत अतिशय स्पष्टपणे मांडले. शिवसेनेचा थेट नामोल्लेख टाळून समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी इच्छा असली तरी वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची भाजपची संपूर्ण तयारी असल्याचेच आज दानवे यांनी स्पष्ट केले.

दानवे म्हणाले, राज्यात व देशात भाजपला अतिशय चांगले वातावरण असून गेल्या वेळेपेक्षा यंदा जास्त जागा भाजपला मिळतील. देशपातळीवरील आघाड्यांपेक्षाही राज्यस्तरावरील आघाड्यांना आता महत्व प्राप्त होत असल्याने स्थानिक आघाड्या लोकसभा निवडणूकीतही महत्वाच्या ठरतील, असे त्यांनी नमूद केले. 

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपण लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी जाहिर केल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांच्याशी आमची याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी व नरेंद्र मोदी असा पंतप्रधानपदासाठी सामना झाला तर या देशातील लोक मोदींच्याच बाजूने कौल देतील, असे ते म्हणाले. राज्याच्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी बहुसंख्य मतदारसंघाचा आढावा घेतलेला असून पक्षाला उत्तम स्थिती असून कार्यकर्त्यांनी जबाबदारी चोख पार पाडल्याचे सांगत संघटनेच्या बळावरच भाजप आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.

अस्तित्व टिकविण्यासाठी आघाड्या

जे पक्ष आघाड्यात समाविष्ट होत आहेत ते आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठीच हे पाऊल उचलत आहेत. सपा व बसपातील आघाडीचा संदर्भ देत अशा आघाड्यांचे प्रयोग या पूर्वीही झाले आहेत. मात्र, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनाच लोक कौल देतील, असे रावसाहेब दानवे म्हणाले. 

Web Title: Then Without you Raosaheb Danave on Alliance Issue