बारामतीकरांचा पॅटर्नच वेगळा, अखेर करून दाखवलं! 

मिलिंद संगई  
Thursday, 30 April 2020

कोरोनामुळे बारामतीतील दोन जणांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांना इतर व्याधींनीही ग्रासलेले होते.

बारामती (पुणे) : शहरातील अखेरचा कोरोना रुग्ण गुरुवारी (ता. 30) रुग्णालयातून घरी परतला. त्यामुळे बारामती खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त झाली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

बारामतीत कोरोनाचा शेवटचा रुग्ण 14 एप्रिल रोजी सापडला होता. त्याच्यावर यशस्वी उपचार झाल्यानंतरच्या त्याच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता बारामतीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कोणाचीही तपासणी किंवा अहवाल येणे बाकी नाही. कोरोनामुळे बारामतीतील दोन जणांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांना इतर व्याधींनीही ग्रासलेले होते. बारामतीत लॉकडाउनची प्रक्रिया कडकपणे राबविण्यात आल्या. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बारामती कोरोनामुक्त झाले. 

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, मग सुरू झाले..  

बारामतीत कोरोनाचे रुग्ण नियमितपणे सापडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हातात घेत प्रारंभी भिलवाडा व त्यानंतर बारामती पॅटर्न बारामतीत राबविला. कोणत्याही वस्तूसाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, या उद्देशाने ही यंत्रणा राबविली गेली होती. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आज तरी बारामतीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच, कोणाचीही तपासणी शिल्लक नाही. आरोग्य विभागाने यात मोलाची कामगिरी बजावत हजारो लोकांच्या चाचण्या केल्या. 

लॉकडाउनमधून मुक्तता करा 
बारामती आता कोरोनामुक्त झाल्यामुळे 4 मेपासून बारामतीची लॉकडाउनमधून मुक्तता करावी, अशी समाजाच्या सर्व घटकातील लोकांची मागणी आहे. बारामती गेल्या 40 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आता ही स्थिती बदलून व्यापार व उद्योग पूर्ववत करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no corona patients in Baramati now