esakal | पुण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी दोनच केंद्र

बोलून बातमी शोधा

Vaccination

पुण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी दोनच केंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी १ मे (शनिवार) पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी लशीच्या तुटवड्यामुळे या निर्णयांची केवळ प्रातिनिधीक पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी केवळ कमला नेहरू रुग्णालय व राजीव गांधी रुग्णालय या दोन ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. ४५ ते पुढील वयोगटाचे लसीकरण शनिवारी व रविवारी बंद असणार आहे.


१ मे पासून लसीकरण होणार असल्याने १८ वयाच्या पुढील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. लसीकरण सर्व केंद्रांवर होईल अशी अपेक्षा होती; पण लसीचा तुटवडा व त्यामुळे नियोजन होऊ न शकल्याने लसीकरणाबाबत संभ्रम होता. याबाबत रात्री उशिरा महापालिकेने भूमिका स्पष्ट केली. ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना या दोन रुग्णालयांचीच निवड केली असेल, अशांनाच लस देण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी केवळ ३५० जणांना लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुण्यासाठी शुक्रवारी पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध

नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या स्लॉटनुसारच वरील दोन लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे, नोंदणी न केलेल्या नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

हेही वाचा: पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी

शनिवार, रविवारी लसीकरण बंद
राज्य शासनाकडून शुक्रवारी केवळ ५ हजार डोस पालिकेला मिळाले आहेत. हे डोस अपुरे असल्याने १ मे व २ मे रोजी ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद असणार आहे. सोमवारी ३ मे रोजी शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे सुरु केले जातील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरात १२ हजार ८८४ जणांचे लसीकरण झाले आहे.