Rahul Gandhi Pune : बायोपिकची कल्पना सध्यातरी नाही - भावे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

राहुल गांधी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास आणि उत्साह जाणवला. त्यांनी सगळ्या प्रश्‍नांची व्यवस्थित उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, त्यांची भेट झाल्यामुळे अतिशय छान वाटले. त्यांना भेटण्याचा अनुभव संस्मरणीय होता, असे अभिनेते सुबोध भावे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

पुणे - राहुल गांधी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास आणि उत्साह जाणवला. त्यांनी सगळ्या प्रश्‍नांची व्यवस्थित उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, त्यांची भेट झाल्यामुळे अतिशय छान वाटले. त्यांना भेटण्याचा अनुभव संस्मरणीय होता, असे अभिनेते सुबोध भावे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. राहुल यांच्यावरील बायोपिक हा फक्त गंमत करण्याचा विषय होता. तशी कोणतीही कल्पना सध्यातरी डोक्‍यात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भावे म्हणाले, ‘‘राजकीय व्यक्तीशी संवाद साधण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मुलाखतीआधी त्यांच्याशी फक्त पाच मिनिटं बोललो होतो. आम्ही कोणते प्रश्‍न विचारणार, याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. तरीही त्यांनी अतिशय उत्साहाने आणि व्यवस्थित उत्तरे दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे प्रश्‍न आणि  त्यांचा प्रतिसाद हा खरंच वाखणण्याजोगा होता.’’  

राहुल यांच्या आगमनाआधी भावे व्यासपीठावर आले आणि राहुल यांच्याबाबत ‘बायोपिक’ करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुबोध हे शिवसेनेचे सदस्य आहेत. शिवाय, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सुबोध हे राहुल  यांच्या कार्यक्रमात कसे, अशी चर्चा रंगली होती.. 

Web Title: There is currently no ideas biopic says bhave