esakal | खडकवासला येथे नसतो गोधडी महोत्सव ; ती असते दसरा दिवाळी पूर्वीची स्वच्छता मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

खडकवासला येथे नसतो गोधडी महोत्सव ; ती असते दसरा दिवाळी पूर्वीची स्वच्छता मोहिम

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

-काय आहे व्हायरल व्हिडिओ

खडकवासला धरणातील पाणी मुठा नदीत सोडले जाते. त्या खडकावर रंगीबेरंगी गोधड्या धुऊण व वाळत टाकल्या आहेत. खडकावर जागा नसल्याने अगदी पुलाच्या कठड्यावर गोधड्या वाळत आहेत. धरणाच्या पुलावरून हा व्हिडिओ घेतला आहे. एका दुचाकीवर बसलेल्या युवकाने हा व्हिडिओ चित्रित केल्याचे दिसत आहे. पुलाच्या पश्चिम व पूर्व बाजूला गोधड्या वाळताना दिसत आहेत. गोधड्या धुण्यासाठी आलेल्यांची वाहने पुलावर उभी आहेत. पुलाच्या पूर्व बाजूला नदी पात्रात काही जणांनी रिक्षा टेंपो हि वाहने दिसत आहेत.

-काय व्हायरल झाले

खडकवासला धरण परिसरात गोधडी धुण्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर रविवारी व्हायरल झाला. सोमवारी त्या आणखी भर पडली. ‘खडकवासला गोधडी महोत्सव’ तर कोणी ‘खडकवासला गोधडी धुवा महोत्सव’ या शीर्षकाने नावाने हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल अधिक झाल्याने अनेकांनी असा काही गोधडी महोत्सव आहे का, अशी देखील चौकशी करण्यास सुरवात केली आहे. परंतु असा काही सार्वजनिक कार्यक्रम महोत्सव या परिसरात भरत नाही.

हेही वाचा: पंढरपुरात सुप्रिया स्वधार मोहिमेला सुरवात

-काय वस्तुस्थिती

खडकवासला धरणालगत नदीच्या पात्रात खडकाचा परिसर मोठा आहे. धरणालगत नदीच्या पात्रात खड्ड्यांमध्ये नदीत सोडलेले पाणी किंवा पावसाचं पाणी साठते. पाणी साठल्याने डोह तयार झाले आहेत. डोहातील पाण्यात गोधड्या धुतल्या जातात. गोधड्या आपटून स्वच्छ करण्यासाठी खडक आहे. त्या वाळत टाकण्यासाठी खडकावर जागा देखील मुबलक आहे. अनेकांच्या घरातील गोधड्या विविध रंगाच्या असतात. त्यामुळे विविध रंग येथे दिसतात.

-दरवर्षी गोधड्या धुण्याची वेळ हीच का

खडकवासला धरण परिसर कार्यात मावळात पावसाचे प्रमाण जास्त असते. जून पासून पाऊस वाढत जातो. घरातील अंथरूण-पांघरूण धुण्यास त्यावेळी संधी नसते. गणपतीनंतर पाऊस कमी होऊन ऊन पडते. पितृ पंधरवड्याच्या दरम्यान नवरात्र पूर्वी घरातील अंथरूण- पांघरूण धुतली जातात. नवरात्र निमिताने घरी देव येतात. नवरात्र सुरु होतो. दसरा आणि त्या पुढे 15 दिवसांनी दिवाळी असते. त्यापूर्वी घराची स्वच्छता करण्याची पद्धत आहे. नवरात्र पूर्वीचा अगोदरच्या रविवारी सुट्टी असल्याने गोधड्या धुण्यासाठी अधिक गर्दी होते. असा काही गोधडी महोत्सव या ठिकाणी नसतो. ती असते दसरा दिवाळी पूर्वीची स्वच्छता मोहिम !

loading image
go to top