पुणे : दत्तनगर भागाकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी रस्ताच नाही; वाहनचालकांचे हाल

पुणे : दत्तनगर भागाकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी रस्ताच नाही; वाहनचालकांचे हाल

कात्रज : दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पुणे-मुंबई रस्त्यावरून येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दक्षिण पुण्यातील दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून या भागाची ओळख आहे. या भागाकडे नागरिकांना येण्यासाठी राजमाता भुयारी मार्ग हा एकमेव भुयारी मार्ग असून तो छोटा आहे. या भुयारी मार्गामध्ये सकाळ-संध्याकाळी मोठ-मोठ्या रांगा लागत आहेत.

कोरोना महामारीनंतर अनलॉक होत असताना नागरी जीवन पूर्ववत होत आहे. उद्योगधंदे सुरू झाल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. कामकाजानिमित्त सकाळी आणि संध्याकाळी लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. त्याचबरोबर, नवले पुलापासून कात्रज चौकापर्यंत चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सर्विस रस्त्यालादेखील मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग टाकल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे आहे. वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहाणी केली त्यावेळी पाच किलोमीटर मार्गावर सुरु असलेले रुंदीकरणाचे काम व नियोजित असलेल्या दोन भुयारी मार्गाच्या अनुषंगाने कामास गती देणार असल्याचे राष्ट्रीय मार्गाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले होते. परंतु, भुयारी मार्गाच्या कामाला गती आलेली नसून या भागातील नागरिकांसमोर असलेला वाहतूककोंडीचा प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न अुनत्तरित आहे.

महामार्गाकडे येणारा रस्ता बंद केल्यामुळे सप्टेंबर महिन्यातच रास्ता रोको आंदोलन करण्याचा आमचा निर्धार असताना पोलिसांनी कोरोना महामारीचा काळ सुरू असून आंदोलन करू नका अशी आम्हास विनंती केली होती. परंतु, आजतागायत पुणे महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत झाली नसल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे -शंकरराव बेलदरे-पाटील, माजी नगरसेवक
 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com