वालचंदनगरमध्ये रस्त्याच्या कामासाठी गांधीगिरी

राजकुमार थोरात
रविवार, 29 एप्रिल 2018

मनसेच्या वतीने रस्त्याच्या मध्ये वृक्षारोपण गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. 

वालचंदनगर (ता. इंदापूर) - जवळील गार्डन ते लालपुरी रस्ता खराब झाला असून रस्त्याचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी मनसेच्या वतीने रस्त्याच्या मध्ये वृक्षारोपण गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. 

वालचंदनगर जवळ गार्डन ते लालपुरी हा सुमारे दोन ते अडीच कि.मी लांबीचा रस्ता आहे. या रस्त्याने अनेक नागरिक  नियमित वालचंदनगर ला ये-जा करीत असतात. तसेच येथील गार्डन परीसरामध्ये खासगी दवाखान्यांची संख्या जास्त असून दवाखान्यामध्ये ये-जा करण्याची वर्दळ असते. खराब रत्याचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना त्रास होत असून रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यामधील खड्यामध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष  संतोष भिसे, उपाध्यक्ष प्रदीप रकटे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, अमित कणसे, विशाल चव्हाण, मलिक शेख, वैभव चव्हाण, रविंद्र भिसे, अमर निंबाळकर उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: there was a movement in the road of valchandanagar by MNS