हर्षवर्धन पाटील यांना कार्यक्रमास बोलाविण्यास हरकत नव्हती : बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

इंदापूर : उद्‌घाटन कुणी केले तरी सातबारावर आपले नाव लागत नाही. त्यामुळे नावासाठी काही न करता सर्वसामान्यांच्या विकासासाठी राजकारण करावे लागते. प्रशासकीय भवन इमारतीसाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून जागा दिली. तसेच राज्य सरकारकडून निधी मिळवून दिल्याने त्यांना कार्यक्रमास बोलाविण्यास हरकत नव्हती, असा निर्वाळा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. 

प्रशासकीय भवन इमारतीचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. मात्र, त्याच्या निमंत्रण पत्रिकेवर पाटील यांचे नाव नसल्याने नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच, या कृतीचा निषेधही केला. बापट यांना ही बाब समजताच त्यांनी ज्यांनी या इमारतीसाठी योगदान दिले, त्यांना बोलाविण्यास हरकत नव्हती असे स्पष्ट करत त्यांना पाटील यांचे वावडे नसल्याचे दाखवून दिले.

या पार्श्वभूमीवर मंत्री बापट यांनी निवडणुका होतील, राजकारण होईल, मात्र मी व आमदार भरणे आहे तेथेच राहणार असे सूचक उद्गार काढले. जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांचेही काम चांगले असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 

भाजपची राष्ट्रवादीवर मात... 
दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक श्रीधर बाब्रस यांना व्यासपीठासमोरील रांगेत बसविल्याने तालुक्‍यातील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भाजपने मात केल्याची चर्चा जोरात रंगली. 
 
Web Title: There was no objection to invite HarshVardhan Patil says Bapat