Wakad Building : थेरगावातील ती वाकलेली इमारात जमीनदोस्त; नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास

महापालिका, अग्निशामक, पोलीस अधिकारी सकाळपासूनच घटनास्थळी तळ ठोकून होते. सकाळी अकराच्या सुमारास दोन पोकलेनच्या सहाय्याने कारवाईला सुरुवात झाली. बॅरिकेट्स लावून या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
thergaon bend building demolished bmc officials fire brigade police
thergaon bend building demolished bmc officials fire brigade policeSakal

- बेलाजी पात्रे

Wakad News : मंगळवारी रात्रीपासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालणारी थेरगावातील वाकलेली इमारत अखेर महापालिकेने बुधवारी (ता. १४) दुपारी साडे बाराच्या सुमारास जमिनोदोस्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारवाईवेळी महापालिका, अग्निशामक, पोलीस अधिकारी सकाळपासूनच घटनास्थळी तळ ठोकून होते.

सकाळी अकराच्या सुमारास दोन पोकलेनच्या सहाय्याने कारवाईला सुरुवात झाली. बॅरिकेट्स लावून या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. पादचाऱ्यांना देखील येथून ये- जा करण्यास मनाई होती.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, सुनिल भागवानी, मनोज लोणकर, ग क्षेत्रिय अधिकारी येडे पाटील यांच्यासह महापालिकेच्या स्थापत्य, बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

काळाखडक गणेश नगर रस्त्यावरील दुर्गा कॉलनी क्रमांक एकच्या कोपऱ्यावर बांधकाम सुरू असलेली ही तीन मजली इमारत दोलाणी नावाच्या विकसकाचे होती. रीतसर परवानगी घेऊन बांधकाम सुरु होते.

मात्र, इमारत एका बाजूला कलली असून केंव्हाही पडू शकते असा कॉल पोलीस आणि अग्निशामक दलाला मंगळवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास आला आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. बिल्डिंग पडणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि या रस्त्यावरती बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. ही गर्दी हटवताना पोलिसांची मोठी दमछाक होत होती.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस, अग्निशामक दल, महापालिका अधिकाऱ्यांन खबरदारीची उपाययोजना म्हणून आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते.

खर्च बिल्डरकडून वसुल करणार

महापालिककेने हे बांधकाम पाडण्यासाठी मोठी यंत्र सामग्रीचा वापर केला. दोन पोकलेन व एक अतिरिक्त पोकलेन जेसीबीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा लावाजमा सकाळपासून घटनास्थळी दाखल झाला होता. ही इमारत पाडण्यासाठी व राडारोडा बाजूला घेण्यासाठी तब्ब्ल चार तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे ह्या यंत्रणेचा सर्व खर्च संबंधित बिल्डरकडून वसुल करणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थी-पालकांची तारांबळ, वाहतूक कोंडी

इमारत पाडताना खबरदारी म्हणून हा परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना आणि पालकांना याचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला स्कूल बसेस घटनास्थळापर्यंत येत असतं मात्र, रस्ता बंद असल्याने वरून पुन्हा मागे फिरत त्यामुळे ट्रॅफिक जाम देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती. विद्यार्थ्याला घरी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला.

ही इमारत मागील इमारतीनां चिटकून बांधण्यात आली होती ती थोडी तिरपी झाल्याने पाडण्यात आली. मात्र हे सर्व कशामुळे झाले आणि याबाबत नेमके दोषी कोण याचा तपास व संशोधन सुरू आहे. वरिष्टांशी चर्चा करून दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.

- सुनिल भागवानी कार्यकारी अभियंता बांधकाम परवाना विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com