थेरगाव क्वीनचा आगाऊपणा! पोलिसांनी अटक केलेला व्हिडिओ टाकला इंस्टावर
पुणे : सोशल मीडियावर थेरगाव क्वीन नावानं अकाऊंट (Thergaon Queen Social Media Account) असलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. पण, तिचा आगाऊपणा कमी झालेला दिसत नाही. तरुणी पोलिसांच्या (Pimpari Chinchwad Police) ताब्यातून सुटताच तिनं आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पोलिसांनी तिला अटक केली होती त्याचा व्हिडिओ बनवून तिनं इंस्टाग्राम रीलला (Instagram) टाकला आहे.
थेरगाव क्विन तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती शिव्या आणि धमक्या देताना दिसत होती. त्यामुळे अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिला अटक करत चांगलाच धडा शिकवला होता. सोशल मीडियावरून दहशत निर्माण करणाऱ्या थेरगाव क्विन आणि तिच्या मित्रांना वठवणीवर आणण्याचं काम पोलिसांनी केलं. पोलिसांनी असं पुन्हा करायचं नाही, असा समज देऊन तिला सोडलं. त्यांनी पोलिसांची माफी देखील मागितली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडलं. त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ टाकला आहे. या आगाऊ तरुणीनं पोलिसांनी अटक करतानाच व्हिडिओ बनवलाय आणि त्याला देखील भाईगिरी करणारं गाणं लावलंय. त्यामुळे आता या सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांचं भय उरलं की नाही? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, तिचा एक व्हिडिओ आणखी व्हायरल झाला होता. त्यात तिचे मित्र तिचं जंगी स्वागत करताना दिसून येत होते. हा व्हिडिओ तुरुंगाबाहेर आल्यानंतरचा असल्याचं सांगितलं गेलं. पण, नेमका कधीचा आहे याबद्दल अद्याप माहिती मिळू शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.