esakal | Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार
sakal

बोलून बातमी शोधा

these are the 8 candidates from bjp for pune s assembly constituency in maharashtra vidhansabha elections 2019

Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील आठही उमेदवारांचा समावेश असून, कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक, कोथरूड चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Vidhan Sabha 2019 : भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपने आज दिल्लीत पहिली यादी जाहीर केली. यामध्ये राज्यातील 125 मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यातील कसबा, कोथरूड आणि शिवाजीनगर या मतदार संघांसह हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती या मतदारसंघांचा समावेश आहे. 

शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली असून कोथरूड मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना, तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, हडपसरमधून विद्यमान आमदार योगेश टिळेकर, खडकावासल्यातून भीमराव तापकीर, पर्वतीतून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना उमदेवारी कायम ठेवण्यात आली आहे.

Vidhan Sabha 2019 : भाजपकडून 12 विद्यमान आमदारांना डच्चू; यादी जाहीर

विशेष म्हणजे कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असतानाही त्यांचा पत्ता कट करून अनुक्रमे पाटील आणि शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसब्याचे आमदार गिरीश बापट हे खासदार झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे कसबा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. मात्र, महापौर टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.