
ओतूर (पुणे) : एक रोलमॉडेल सांसदग्राम करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक व पत्रकार यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. जुन्नर तालुक्यातील कोपरे- जांभूळशी या आदिवासी गावाच्या माध्यमातून केवळ प्रशासकीय नाही, तर विकासाच्या दृष्टीने आदर्श असे सांसदग्राम बनवण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे सांगितले.
कोपरे- जांभूळशी हे गाव अमोल कोल्हे यांनी सांसदग्रामसाठी निवडले आहे. या गावाच्या प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार अतुल बेनके, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे, दादाभाऊ बगाड, देवराम मुंढे, गोविंद साबळे, बुधाजी शिंगाडे, सरपंच ठमाजी कवटे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, कृषी अधिकारी एस. के. शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, गट विकास अधिकारी हेमंत गरिबे, सहायक पोलिस निरीक्षक परशूराम कांबळे, वनक्षेत्रपाल योगेश घोडके, पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे कैलास टोपे, महावितरणचे एस. के. लोथे, सार्वजनिक बांधकामचे महेंद्र पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
या परिसरात लवकरच नेटवर्क उपलब्ध करुन इंटरनेट सुविधा सुरु करणे, पाणी टंचाई दुर करण्यासाठी एम.आय. टॅक बरोबर छोटे बंधारे, वनराई बंधारे, शिवकालीन टाक्या, तसेच आरोग्य सुविधेसाठी परिसरात एक रुग्णवाहिका व आरोग्य उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना सर्पदंशाच्या उपचाराबाबत प्रशिक्षण, केंद्रात लस उपलब्ध करुन देणे, शासकीय कामे व रस्ते याचा दर्जा राखणे या व इतर वेगवेगळ्या सूचना अधिकारी वर्गाला कोल्हे यांनी दिल्या.
अतुल बेनके म्हणाले की, या परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. कोपरे जाभूंळशी गावादरम्यान नदीवर पुलासाठी प्रयत्न करणार आहे. मनरेगाअंतर्गत लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
जांभूळशी गावातील सर्व कुटुंबांना सोलर सिस्टीम उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेशही कोल्हे यांनी दिले. तर, काही आदिवासी भागात कोल्हे व बेनके यांनी दुचाकीवर प्रवास करून नागरिकांशी संवाद साधून पाहणी केली. तसेच, मांडवे, मांदारणे, उदापूर, ओतूर, गोळेगाव या भागात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.