Family in Theur Brutally Assaulted Over Old Dispute
सुनील जगताप
थेऊर : तु काल आमच्या विरुध्द पोलीसात तक्रार का दिली, तुम्हाला आम्ही आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जुन्या वादाचा राग मनात धरून एका कुटुंबाला लोखंडी गज,लोखंडी हत्यार व दगडाने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील चव्हाण वस्ती परिसरात शनिवारी घडली आहे. या मारहाणीत एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले आहे तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ३ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयनाबाई दिलीप चव्हाण (वय ५५) त्यांचे पती दिलीप चव्हाण, मुलगा शेखर चव्हाण,सून पुजा चव्हाण व मुलगी उज्ज्वला सावंत अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.