आईसक्रीम खाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील चैन चोरट्यांनी हिसकावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुणे : आईसक्रीम खाण्यासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयाने जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता वानवडी परिसरात घडली.

पुणे : आईसक्रीम खाण्यासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयाने जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता वानवडी परिसरात घडली.

याप्रकरणी सीमा योगेश परुलेकर (रा. वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांची मैत्रीण अधिकाऱ्या दोघी आईसक्रीम खाण्यासाठी वानवडीतील सिक्रेट हार्ट सोसायटीसमोरुन पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या चोरटयांनी अधिकाऱ्यांच्या गळ्यातील 10 हजार रूपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.

Web Title: Thief snatch women's gold Chain