महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणेतीन लाखांचे दागिने केले लंपास

जनार्दन दांडगे
Tuesday, 23 February 2021

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील मंगल कार्यालयाच्या शेजारील शेतात गेलेल्या एका विवाहीत महिलेला धक्का मारुन एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले.

लोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील मंगल कार्यालयाच्या शेजारील शेतात गेलेल्या एका विवाहीत महिलेला धक्का मारुन एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले. ही घटना सोमवारी (ता. २३ ) संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. 

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

संध्याराणी सतीश सोनवणे (वय ४५, रा. लोणंद ता. खंडाळा, जि. सातारा) हे महिलेचे नाव आहे सोनवणे या सोमवारी कुंजीरवाडी येथे नातेवाईकांच्या विवाहनिमित्त आल्या होत्या. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका अज्ञाताच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याराणी सोनवणे या नातेवाईकाच्या लग्नासाठी कुंजीरवाडी येथील एका खाजगी मंगल कार्यालयात आल्या होत्या. लग्न उरकल्यानंतर, रात्री साडेनऊच्या  सुमारास संध्याराणी व त्यांच्या दोन मैत्रीनी मंगलकार्यालयाच्या शेजारील शेतात गेल्या होत्या. संध्याराणी यांच्या मैत्रीनी कल्पना जगताप, संजीवनी सपकाळ दोघी पुढे चालत होत्या. तर वरील दोघींच्या मागे अंदाजे पाच फूट अंतराने संध्याराणी सोनवणे चालत होत्या.

चोराचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे, अंगाने सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा शर्ट घातलेला चोरट्याने संध्याराणी सोनवणे यांना धक्का दिला व गळ्यामधील सोन्याचे दागिने हिसकावले. संध्याराणी ही बाब समजण्याच्या आतच सदर इसम अंधाराचा फायदा घेत मंगलकार्यालयापासून शेतात पळून गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान ही बाब संध्याराणी यांच्या नातेवाईकांना समजताच, संध्याराणी व त्यांच्या नातेवाईकांनी सदर इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर इसम पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief stole three lakh jewelery from the woman

Tags
टॉपिकस
Topic Tags: