esakal | मंडईच्या शारदा गजानन मंदिरात चोरी करणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

The thief who stole from the Sharda Gajanan temple in Mandai was caught by the Mumbai Railway Police


पोलिसांनी त्याच्याकडुन पाच लाखाचे दागिने व दिड लाख रूपयांची रोकड असा साडे सहा लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.विश्रामबाग पोलिस व गुन्हे शाखा यांची तीन पथके आरोपीच्या मागावर होती

मंडईच्या शारदा गजानन मंदिरात चोरी करणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन गणपती मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या चोरटयास मुंबई लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता बेडया ठोकल्या. त्यानंतर त्यास पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्याच्याकडुन पाच लाखाचे दागिने व दिड लाख रूपयांची रोकड असा साडे सहा लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.विश्रामबाग पोलिस व गुन्हे शाखा यांची तीन पथके आरोपीच्या मागावर होती. अजय महावीर भुक्तर ( वय 19, व्यवसाय-सिध्दार्थ नगर, हिंगोली रेल्वे स्टेशन जवळ, हिंगोली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरातील सभामंडपाकडे जाणाऱ्या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्याने मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने श्री शारदा गजाननाच्या मुर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसुत्र अशी पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. मंदिराचे पुजारी शुक्रवारी सकाळी नित्यपुजेसाठी मंदिरात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली. त्यानंतर सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली होती. 

दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट एकची दोन पथके मुंबईत आरोपीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस कर्मचारी लहामगे, चव्हाण,वाडेकर, जाधव, महाजन, गुजर, खांडेकर हे मुंबईतील दागीना बाजार येथील धनजी स्ट्रीट नाका परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मंडईतील शारदा गजानन मंदिरात चोरी केलेला आरोपी तेथे असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने लोहमार्ग विभागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस अटक केली.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

पोलिसांनी त्याच्याकडुन सव्वा पाच लाखाचे दागिने व दिड लाखाची रोकड़ हस्तगत करून आरोपीस पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.दीपक निकम यांनी यापूर्वी पुणे पोलिस दलात अनेक वर्ष चांगली कामगिरी बजावली आहे. काही वर्षापूर्वीच त्यांची मुंबईला बदली झाली होती. त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले

loading image
go to top