Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांना अटक

याबाबत पोलिस कर्मचारी अमोल दबडे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
Pune News
Pune Newsesakal

पुणे : सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून कोयत्यांसह दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे.

Pune News
Maharashtra News: भाजपचे नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

याबाबत पोलिस कर्मचारी अमोल दबडे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बसवराज ऊर्फ अभिषेक ऊर्फ माया राजेंद्र पाटील (वय १९), अमित शंकर कांदे (वय २७, दोघे रा. जनता वसाहत, पर्वती) या दोघांना अटक केली. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ओंकार ऊर्फ दाद्या वामन आल्हाट, अमन झारेकरी (दोघे रा. दांडेकर पूल), प्रमोद अंकुश कळंबे (रा. पर्वती दर्शन), पृथ्वीराज कांबळे (रा. संतोषनगर, कात्रज) अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे दांडेकर पुलाजवळ पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत होते. जनता वसाहतीमधील कॅनॉल रस्त्यालगत लोखंडी पुलाजवळ ते असल्याची माहिती पर्वती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे इतर चार साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com