
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एक लाख बावीस हजार रुपये किंमतीचे दागीने चोरून नेल्याची फिर्याद दाखल होती.
वडगाव निंबाळकर (पुणे) ता. २६ : मोरगाव ता. बारामती येथील वृद्ध महीलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना मुद्दे मालासह अटक करण्यात वडगाव निंबाळकर पोलीसांना यश आले आहे. मोरगाव येथिल निळकंठेश्वर मंदीर परीसरातून १६ ऑगष्ट २०२० रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास विजया जगन्नाथ वाघ वय ७६ वर्षे त्यांच्या घरी येवून 'तुमच्या हातातील सोन्याच्या बांगडयांची डिजाईन बघावयाची आहे. मला अशाच बांगडया करावयाच्या आहे. असे म्हणत बाहेर दाखवतो असा बहाणा करत दागिने घेऊन चोरटे पळून गेले होते. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एक लाख बावीस हजार रुपये किंमतीचे दागीने चोरून नेल्याची फिर्याद दाखल होती.
शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा पोलीस स्टेशन येथे याच पध्दतीचा गुन्हा घडला. येथील पोलिसांनी आरोपींना पकडले. वडगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अनिल रघुनाथ बिरदावडे (वय ३१) अशोक नामदेव गंगावणे (वय ३०) दोन्ही रा बांदलवाडी ता बारामती यांना वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला आणले मोरगावच्या चोरीबाबत कसून चौकशी केली असता बिरदावडे याने त्याच्या गावातील सुनिल शिवाजी वायकर वय ३५ रा बांदलवडी ता बारामती याचे साथीने गुन्हा केलेचे कबुल केले. आरोपी वायकर याला बांदलवडी ता बारामती येथुन अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील ४६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया व पाटल्या जप्त करण्यात आल्या आहे.
हेही वाचा - चोरट्यांनी ATM मशीन स्कॉर्पिओतून पळवलं; 5 मिनिटाची चोरी CCTV त कैद
आरोपींनी वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभाग, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायन शिरगावकर, पोलीस निरीक्षक पद्मकर घनवट स्था.गु.शा पुणे ग्रामीण, तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक एस व्ही लांडे सो मार्गदर्शनाखाली पोहवा रविंद्र पाटमास, पोना शरद धेंडे, सहा फौज पोपट जाधव, पो.काँ. सुशांत पिसाळ, अक्षय सिताप, ज्ञानेश्वर सानप,अमोल भुजबळ, गोपाळ जाधव यांनी कारवाई केलेली आहे.