esakal | पाटसमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, सव्वाचार तोळे सोने, रोख रक्कमेची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पाटसमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, सव्वाचार तोळे सोने, रोख रक्कमेची चोरी

sakal_logo
By
अमर परदेशी

पाटस : पाटस येथील वाबळेवस्ती भागात रविवारी (ता.५) मध्यरात्री चोरटयांनी चांगलाच धुमाकुळ घातला. यावेळी दोन कुटुंबातील घरात चोरटयांनी शिरकाव करीत रोख रक्कमेसह तब्बल सव्वा चार तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारुन पोबारा केला. चोरीच्या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ उडाली. काही महिण्यांपासुन यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहे. मागील महीन्यात पाटस परीसरात महामार्गावर एसटी थांबुन सव्वा कोटी रुपयांची चोरीची घटना घडली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. (Pune News)

पाटस परीसरातील वाबळे वस्ती भागात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी अक्षरशा धुमाकुळ घातला. येथील अशोक तोंडे यांच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी प्रवेश करीत कपाटातील पावणे तीन तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम घेवुन पोबारा केला. रात्री कुत्र्यांचा भुकण्यांचा आवाज आल्याने तोंडे जागे झाले.त्यावेळी त्यांना घरातील कपाट उघडलेले असुन साहीत्य इतरत्र पडल्याचे दिसले. खात्री केली असता कपाटातील दागिने व रोख रक्कन गायब झाल्याचे समजले. त्याच बरोबर काही अंतरावर राहणारे धनंजय लवाण यांच्या घरातही चोरीचा प्रकार घडला.

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

चोरटयांनी खोलीच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन घरात प्रवेश केला. कपाटातील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला. वस्ती भागात चोरीचा प्रकार लक्षात येताच पंचायत समितीचे उपसभापती साहेबराव यांनी पोलिसांना कळविले. पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे,पोलिस नाइक घनशाम चव्हाण,समिर भालेराव,राम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरांच्या तपासासाठी श्वान पथक,तसेच ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

loading image
go to top