सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांनी वडगाव येथील दुकाने फोडली

चिंतामणी क्षीरसागर 
Sunday, 18 October 2020

दोन सख्ख्या भावांची दुकाने फोडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला ही घटना वडगाव येथे घडली.

वडगाव निंबाळकर ः  बाजारपेठेतील प्रमुख दुकानदारांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. याकडे दुर्लक्ष करणे वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील दुकानदारांना तोट्याचे ठरले. रात्रीत दोन सख्ख्या भावांची दुकान फोडली येथून सुमारे दीड लाख रुपये ऐवज चोरून नेला दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवार (ता. १८) पहाटे दोनच्या सुमारास येथिल बाजार पेठेतील संतोष जवाहरलाल शहा यांच्या किराणा दुकानाचे कुलुप तोडून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली.

जवळील सुधीर जवाहरलाल शहा यांच्या धान्य दुकानाचे कुलुप तोडुन रोख रक्कम चोरली. दोन्ही दुकानातील सुमारे दीड लाख रुपये चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. येथील सीसीटीव्ही अनेक दिवसांपासून बंद होते. राजेंद्र पवार यांच्या घराचे कुलूप तोडले दरवाजा आतून बंद असल्याने उघडता आला नाही. आतून आवाज दिल्याने चोरटे निघून गेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळून जात असताना येथील सुरक्षारक्षकाने अज्ञात सहा इसम दोन दुचाकी घेऊन संशयीतरित्या जात असताना दिसून आले. तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून संशयित व्यक्तींची माहिती सांगितली पोलीस पोचण्यापूर्वी चोरटे पळून गेले. 

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​

मंगळवार (ता. 13 रोजी) रात्री धर्मेंद्र पवार यांच्या बंद घराचे कुलुप तोडून सुमारे १५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. पांढरी भागातील बंद घराचे कुलूप तोडले होते यामध्ये काहीच नसल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.

रमाई माता नगर परिसरात बाहेर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील डाग काढण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता गेल्या आठ दिवसात चोरटायांनी या परिसरात धुमाकूळ घातला आहे. 

यापूर्वी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या दुकानासमोर बसविण्याच्या सूचना व्यवसायिकांना दिल्या होत्या चोरीचा प्रकार घडला यावेळी येथील सीसीटीव्ही बंद होते परिणामी चोरटे लक्षात आले नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves stole Rs 1.5 lakh from Wadgaon