
अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणावं चोरट्यांना; लोणी-काळभोरमधून डोळे चेक करायच्या मशिन पळवल्या
लोणी काळभोर (पुणे) : 80 हजार रुपये किमतीच्या डोळे चेक करण्याच्या मशिन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. गुरूवारी (ता.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानदार ज्ञानेश्वर दत्तात्रय कुंभार यांनी लोणी काळभोर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- पुण्यात क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश; आणखी एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कुंभार यांचे लोणी स्टेशन येथे चष्म्याचे दुकान आहे. बुधवारी (ता.१०) संध्याकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेजारी दुकानदार असलेले सनी सावंत यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या दुकानाचे शटर दोन फूट उघडलेले दिसत आहे. त्यानंतर कुंभार यांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानाचे शटर उचकटण्यात आल्याचे त्यांना निदर्शनास आले.
- शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मावळ्यांसाठी आनंदाची बातमी; गडावर सापडली शिवकालीन वास्तू
दुकानात जाऊन पाहणी केली असता पन्नास हजार रुपये किमतीची एक आणि तीस हजार रुपये किमतीची एक अशा एकूण 80 हजार रुपयांच्या दोन मशिन्स अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुंभार यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Thieves Stolen Eye Checking Machines Shop Loni Kalbhor Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..