esakal | शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मावळ्यांसाठी आनंदाची बातमी; गडावर सापडली शिवकालीन वास्तू
sakal

बोलून बातमी शोधा

Ghangad_fort

घनगड किल्ल्यावरील हे पाण्याचे टाके दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नव्हते.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मावळ्यांसाठी आनंदाची बातमी; गडावर सापडली शिवकालीन वास्तू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कसं होतं, हे जाणून घेण्यासाठी अनेक युवक गड-किल्ल्यांची भ्रमंती करत असतात. स्वराज्य कार्य या नावाने कार्यरत असलेल्या अशाच एका गटाला मुळशी तालुक्यातील घनगडावर मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले पाण्याचे टाके सापडले. युवकांच्या शोध, संवर्धन मोहिमेतून शिवकालीन इतिहास पुढे येत आहे. 

मुळशी तालुक्यातील घनगड किल्ल्यावर मातीच्या ढिगा-याखाली दबल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्या पुन्हा उजेडात आणण्याचे काम स्वराज्य कार्य या गटाने केलं आहे. या टाक्यातील गाळ साफ करण्याची गरज असून त्यासाठी पुढील काळात मोहीम आखणार असल्याचे नितेश खानेकर यांनी सांगितले. 

German Bakery Blast: 'मी आईवर रागावले, पण आईने तिथून जाण्यास सांगितलं नसतं तर...!'​

खानेकर यांना घनगडावर बालेकिल्ल्याचा दरवाज्याच्या डाव्या बुरुजाच्या बाजूला दोन पायऱ्या दिसल्या. त्याच्या खाली एखादी वास्तू असावी, असा अंदाज आलेल्या खानेकर यांनी 7 फेब्रुवारी रोजी पुरातत्व खात्याच्या परवानगीने गड संवर्धन मोहिमेचे आयोजन केले. त्यामध्ये सहभागी झालेल्या सागर कदम, गणेश खानेकर, आदित्य साठे, वैभव खानेकर, सचिन गोडांबे, सदानंद मालपोटे, अमित खेगरे, रुपेश केंगार, संग्राम वाबळे, तुषार गोरुळे, संदीप बोडके या युवकांनी ही गड संवर्धन मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी साफसफाई करताना त्यांना भुयारी टाके असल्याचे दिसले. या टाक्याची लांबी अंदाजे 10 बाय 20 फूट आहे. या छोट्याशा मोहिमेत शिवकालीन टाके पुन्हा उजेडात आणता आले, याचा आनंद होत असल्याची भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली. 

 हेही वाचा - शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल

घनगड किल्ल्यावरील हे पाण्याचे टाके दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नव्हते. या टाक्यांची निर्मिती कधी आणि कोणी केली हे सांगता येऊ शकत नाही, पण येथील टाके याआधी असे कोणालाच निदर्शनास आले नाही, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे खानेकर यांनी सांगितले. खानेकर म्हणाले की, संवर्धन मोहिमेला आलेल्या यशामुळे या पुढेही अशा मोहिमा करणार असून जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गोष्टी उजेडात आणण्याचे काम आम्ही करत राहू.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top