
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हॉर्स बेटींगमधील गैरप्रकार पुणे पोलिसांनी उघड केला होता. आता पोलिसांनी क्रिकेट बेटींगचा पर्दाफाश केला आहे.
पुणे : आयपीएल, बिग बॅश लिग, भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० सामने, एकदिवसीय आणि कसोटी सामने तसेच सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लड कसोटीच्या कसोटीमध्ये नागरिकांकडून लाखो रुपये बेटींगसाठी उकळल्या प्रकरणात आणखी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
सुनील राजकुमार माखिजा (वय ४२, रा. कोंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या गुन्ह्यात यापूर्वी लाईनबॉय अजय अनिल शिंदे (वय ३६, रा. हंस कॉटेज हाऊस, कल्याणीनगर आणि खडक पोलिस लाईन) आणि गौरव मनोज आहुजा (वय २०, रा. टिळक रोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सुनील हा गौरव याचा मामा आहे.
- German Bakery Blast: 'मी आईवर रागावले, पण आईने तिथून जाण्यास सांगितलं नसतं तर...!'
तिघांवरही अडीच लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथील एका २३ वर्षीय व्यावसायिक तरुणाने याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हॉर्स बेटींगमधील गैरप्रकार पुणे पोलिसांनी उघड केला होता. आता पोलिसांनी क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश केला आहे.
- हेही वाचा - शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी सुनील या अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. ओळखपरेड करण्यासाठी, तसेच गुन्ह्याचा मास्टर माइंड कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी कोंघे यांनी केली. आरोपींचा साथीदार सचिन निवृत्ती पोटे हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)