esakal | हायटेक चोरटे; पुण्यात सिंहगड रस्त्यावर गुगल पेचा वापर करुन जबरी चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

हायटेक चोरटे; पुण्यात सिंहगड रस्त्यावर गुगल पेचा वापर करुन जबरी चोरी

तरुणाच्या गुगल पेद्वारे चोरट्यांनी स्वतःच्या गुगलपेवर घेतली तीन हजार रुपयांची रक्कम 

हायटेक चोरटे; पुण्यात सिंहगड रस्त्यावर गुगल पेचा वापर करुन जबरी चोरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे ः शहरात जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना चोरट्यांकडू चोरी करताना विविध प्रकारच्या क्‍लृप्त्या केल्या जात असल्याच्या घटना घडत आहे. मात्र एका जबरी चोरीच्या घटनेत चोरट्यांनी चोरीसाठी थेट गुगल पेचा वापर पर्याय निवडल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री धायरी परिसरात एका कारचालकाला चोरट्यांनी अडवून जबरदस्तीने त्यांच्या गुगल पे व्दारे चोरट्यांनी स्वतःच्या गुगल पेवर तीन हजार रुपयांची रक्कम वर्ग करुन घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

केतन पाटील (वय 32, रा.डिएसके विश्‍व, धायरी) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मंगळवारी (ता. 6 ऑक्‍टोबर) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा नांदेड सिटी येथे राहणारा मित्र जुनेद देशमुख यांच्याकडे जात होते. फिर्यादी हे त्यांच्या कारमधून डिएसके विश्‍व ते नांदेड फाटा या रस्त्याने जात होते. त्यावेळी चव्हाण बाग कॉर्नरपासून एक किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी तिघेजण त्यांची दुचाकी आडवी लावून थांबले होते. त्यांनी फिर्यादींची गाडी थांबवून त्यांना शिवीगाळ करुन धमकाविण्यास सुरूवात केली.

त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या कारची चावी काढून घेत "तुझी गाडी फोडून टाकू, तुला माहिती नाही का आम्ही कोण आहोत' अशा शब्दात त्यांना धमकाविण्यास सुरूवात केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांच्या मोबाईलमधील गुगल पेचा वापर करुन चोरट्यांनी स्वतःच्यया गुगल पे खात्यावर तीन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली. त्यानंतर फिर्यादींना सोडून दिले. या घटनेमुळे घाबरेल्या फिर्यादींनी या घटनेबाबत तत्काळ सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. व्ही. उमरे करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही दिवसांपुर्वीच घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याने वृद्ध नागरीकाच्या घरी जाऊन वृद्ध नागरीकाची वेगवेगळ्या बॅंकांची खातेपुस्तक व धनादेश चोरुन नेले. त्यानंतर धनादेशाद्वारे तीस ते चाळीस हजार रुपये रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंत आता चोरट्याने चोरीसाठी थेट गुगलपेचा पर्याय निवडल्याची घटना घडली आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

loading image
go to top