Ganesh Bidkar : आजी-माजी नगरसेविकेतील वाद तिसऱ्यानेच पेटवला; सभागृहनेते गणेश बिडकर यांचा दावा

दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्‍या भवन विभागात नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात जोरदार भांडणे झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
Ganesh Bidkar

Ganesh Bidkar

sakal

Updated on

पुणे - बाणेर येथे आदिवासी महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या तीन कोटीच्या निविदेवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकेमध्ये महापालिकेत शिव्यांची लाखोली वाहत झालेल्या जोरदार भांडणावर आज (ता. १७) पडदा टाकण्यात आला. या दोघींमध्ये तिसऱ्याच व्यक्तीने गैरसमज निर्माण करून भांडणे लावून दिली असा दावा सभागृहनेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com