Junnar | शहर सलग तिसऱ्यांदा देश पातळीवरील कचरामुक्त शहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramnath Kovind
जुन्नर शहर सलग तिसऱ्यांदा देश पातळीवरील कचरामुक्त शहर

जुन्नर शहर सलग तिसऱ्यांदा देश पातळीवरील कचरामुक्त शहर

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर - जुन्नर नगर पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ चा कचरा मुक्त शहर हा पुरस्कार मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा देश पातळीवरील कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन पालिकेने प्राप्त केले असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.

आज शनिवार ता. २० रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश भागेल स्वच्छता अभियान सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पाच राज्यातील ३०४ नगरपालिकामध्ये जुन्नर नगर पालिकेचा १८ वा क्रमांक असल्याचे पांडे यांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नागरीकांमध्ये कचऱ्याबाबत जनजागृती व स्वच्छतेची भावना जागृत केली. सार्वजनिक ठिकाणी लीडचे झाकणअसलेले जोड डब्बे (ट्वीन बिन) लावल्याने उघड्यावर पडणारा कचरा कमी होण्यास मदत झाली. शहरात घरगुती कचरा हा ओला, सुका, प्लॅस्टीक व सॅनिटरी कचरा विलगीकरण करून घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण शंभर टक्के आहे.नागरिक स्वत: घरचे घरी किचन वेस्ट पासून सेंद्रीय खत तयार करतात.

हेही वाचा: सांग सांग भोलानाथ, शाळा सुरू होईल का; चिमुकल्यांची विचारणा

आगर येथे शहरातील मैला प्रक्रियेसाठी पालिकेमार्फत एफएसटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. सार्वजनिक १३ शौचालयांपैकी ४ ताराकिंत शौचालये म्हणून घोषित केली आहेत.

शहरात प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांना अल्पदरात पुर्नवापर योग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या.कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत करण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. नगरपालिकेला महाराष्ट्र शासनाचा हरित ब्रांड प्रमाणपत्र प्राप्त आहे. आतापर्यंत ३.५ लाख किलो खताची विक्री झाली आहे.

हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत १६० लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. शहराला ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त झाला. शहरामध्ये वृक्षांची लागवड व जोपासना करत हरित पट्ट्यांची निर्मिती करण्यात येत आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात येतात.

सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे व जैव वैद्यकीय कचऱ्याचे बाहेरील एजन्सी मार्फत व्यवस्थापन करण्यात येत आहे. ई-कचऱ्याबाबत स्वच्छ संस्थेशी करारनामा करण्यात येत आहे. शहरातील कचरा डेपो येथील ५० वर्षांहून जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सुमारे १ हेक्टर जागा पुन्हा प्राप्त करण्यात आली आहे. सदरच्या जागेत रोप वाटिका बनविण्याचे काम प्रगती पथावर आहे.

हेही वाचा: लाडक्या चिंटूंच्या भेटीने मुलांमध्ये हर्षोल्हास

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील कुंभार बांधवांची कार्यशाळा घेवून शाडू मातीच्या मूर्तींचे महत्व सांगण्यात आले व गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.' पर्यावरण पूरक गणराया स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. नदी घाटावर कृत्रिम विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, चारोळी स्पर्धा चित्रांचे प्रदर्शन यातून स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. पथविक्रेता दिनाचे औचित्य साधून व्यापाऱ्यांमध्ये प्लॅस्टिक वापराविषयी जनजागृती करण्यात आली. आठवडा बाजारात प्लॅस्टिक वापरणाऱ्या कडून २५ हजाराहून अधिक दंड वसुल करण्यात आली. शहरामध्ये ठिकठिकाणी भिंती रंगवून बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात येत आहे.

पालिकेने सहा घंटागाड्यांची खरेदी केली आहे. नव्याने अग्निशामक वाहन खरेदी करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात झालेली कामे तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले, असल्याचे नगराध्यक्ष पांडे व कामांमुळेच पुरस्कार मिळाल्याचे व राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले असल्याचे नगराध्यक्ष पांडे व मुख्याधिकारी घोलप यांनी सांगितले.

loading image
go to top