corona third wave | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णांच्या उपचारासाठी मुबलक बेड्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona third wave
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णांच्या उपचारासाठी मुबलक बेड्स

Pune : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णांच्या उपचारासाठी मुबलक बेड्स

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात सध्या चालू झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील (corona third wave) एकही कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, अशी खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. कोरोना रुग्ण (Corona patient) झपाट्याने वाढत असले तरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र पूर्वतयारीचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने ४३ हजार ३३२ बेडस (खाटा) सुविधा निर्माण केली आहे.

हेही वाचा: स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला शिवविचार समजतील

यामुळे तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांना, मागेल त्याला बेड मिळू शकणार आहे. मात्र कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून, खबरदारी घ्या, यामुळे उपचारासाठी बेडची गरजच भासणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयातील मिळून एकूण बेडसची (खाटा) संख्या ८५ हजार ६३ इतकी आहे. यापैकी ४३ हजार ३३२ खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या क्षेत्रनिहाय उपलब्ध असलेल्या एकूण खाटांपैकी पुणे शहरात २८ हजार ३३७ उपलब्ध आहेत. यापैकी ११ हजार २२४ खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण बेडस २४ हजार १५५ आहेत. यापैकी कोरोना रुग्णांसाठी ८ हजार ८९४ राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ३२ हजार ५७१ बेडस आहेत. यापैकी २३ हजार २१४ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: आपल्या आशीर्वादानं सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला 

क्षेत्र आणि संवर्गनिहाय राखीव बेडस

पुणे महापालिका क्षेत्र

 • साधे बेडस (खाटा) - २ हजार ९७६

 • ऑक्सिजन बेडस - ६ हजार ५२८

 • आयसीयू बेडस - ९०५

 • व्हेंटिलेटर बेडस - ८१५

 • एकूण बेडस - ११ हजार २२४

पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्र

 • साधे बेडस (खाटा) - ४ हजार ९५

 • ऑक्सिजन बेडस - ३ हजार ५१८

 • आयसीयू बेडस - ८४८

 • व्हेंटिलेटर बेडस - ४३३

 • एकूण बेडस - ८ हजार ८९४

ग्रामीण भाग

 • साधे बेडस (खाटा) - १५ हजार ५२४

 • ऑक्सिजन बेडस - ५ हजार ५२९

 • आयसीयू बेडस - १ हजार ५८४

 • व्हेंटिलेटर बेडस - ५७७

 • एकूण बेडस - २३ हजार २१४

एकूण पुणे जिल्हा

 • साधे बेडस (खाटा) - २२ हजार ५९५

 • ऑक्सिजन बेडस - १५ हजार ५७५

 • आयसीयू बेडस - ३ हजार ३३७

 • व्हेंटिलेटर बेडस - १ हजार ८२५

 • एकूण बेडस - ४३ हजार ३३२.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे. तरीही उपचारांसाठीच्या रुग्णांची संख्या वाढल्यास, बेडसपासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.

Web Title: Third Wave Of The Corona For The Treatment Of Patients Abundant Beds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top