सासवड शहरात कोरोनाची उसळी, एकाच दिवसात तेरा रुग्ण

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 30 जून 2020

सासवड शहरात काल सकाळी रुग्ण संख्या 31 होती. त्यानंतर आज उडी एकदम 45 वर पोचून तालुका 50 वरुन 67 वर गेला.

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात सासवड शहरात आज कोरोनाचे विक्रमी 13 रुग्ण सापडले. त्यामुळे एकट्या सासवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या 45 वर पोचली. तसेच, तालुक्यातील सोनोरी येथेही एक रुग्ण सापडला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 67 झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तातडीने भेट देण्याचे संकेत आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

सासवड शहरात काल सकाळी रुग्ण संख्या 31 होती. त्यानंतर आज उडी एकदम 45 वर पोचून तालुका 50 वरुन 67 वर गेला. आजच्या पाॅझीटिव्ह 14 रुग्णांमधील एक सोनोरी व बाकी 13 सासवडचे आहेत. सासवडच्या 13 मधील 3 रुग्ण नवीन बाधित असून, 10 रुग्ण जुन्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

शहरातील लांडगे गल्ली पुन्हा एकदा हाॅट स्पाॅट ठरत आहे. तर, बाकी रुग्ण पापीनाथ सोसायटी, महावितरण कार्यालयासमोरील व एका बँकेतील आहे. त्याशिवाय येथे रहिवास नाही, पण काम शहरात करत असलेले एका कंपनीतील दोन, न्यायालयातील एक, पोलिस ठाण्यातील एक, नगरपालिकेतील एक, असे पाच जण बाधीत आहेत. त्यांचे स्वॅब पुण्यात घेतले व ते पाॅझिटिव्ह आले आहेत. येथे निवासी नसल्याने त्यांची तालुक्यात नोंद नाही. मात्र, तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी शहरातील व शहरात काम करणाऱ्या संबंधित रुग्ण संपर्कातील लोकांचे क्वारंटाइन व तपासणीचे बजावले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

सासवड शहरात लाॅकडाउन असतानाही पाॅझिटिव्ह रुग्ण सापडण्यात खंड नव्हता आणि आज लाॅकडाउन शिथिल केला, तर कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने उसळी मारली. लाॅकडाउन व्यापाऱ्यांसह सर्व व्यावसायिकांसाठी शिथिल केला. त्याचवेळी सासवड शहरात आणि लगतच्या गावात मिळून काल तीन व आज 14 रुग्ण सापडल्याने धोका जैसे थे असल्याचे स्पष्ट आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen corona patients in a single day in Saswad city